nagpurruralNews

अंजनगांव सूर्जी येथे जिजाऊ ब्रिगेडचे परिवर्तनवादी हळदी,कुंकू.

विधवामहीलांनाही हळदिकूंकवात सन्मान.

99Views

अंजनगांव सूर्जी:-

प्रतिनिधी:-प्रविणकूमार बोके 

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास परिवर्तन हे आवश्यक आहे.असेच परिवर्तन अंजनगांव सूर्जी शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी घडवून आणले असून हळदि कूंकवाच्या कार्यक्रमात सूवासीनीसोबत विधवा महीलांना सूध्दा सन्मानाचे स्थान देऊन ओटी भरुण त्यांच्या आयूष्यात नवचैतन्य आणन्याचा प्रयत्न जिजाऊ ब्रिगेडने करुन रुढीवादी पंरपरावादी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून अंजनगांव सूर्जी शहराचे नाव अजरामर केले आहे.हा कार्यक्रम दि.६ फेब्रुवारीला स्थानीक गणेश नगर येथे पार पडला.
महाराष्ट्र ही नुसती संताचीच नव्हे तर पूरोगामीत्वाचा पूरस्कार करणार्या संतांची भूमी आहे.त्यातही अमरावती जिल्ह्यात व.राष्ट्रसंत तूकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज , शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमूख यांनी आपल्या परिवर्तनवादी विचारांनी येथील मनामनात स्थान निर्माण केले.त्यांचाच विचार डोळ्यासमोर ठेऊन सर्व रुढी परंपराना झूगारुन जिजाऊब्रिगेडच्या महीलांनी दि.६ फेब्रुवारीला हळदीकूंकवाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.ज्यात चार प्रकारचे परिवर्तन करण्यात आले .पहीले म्हणजे अमावसेनंतर हळदिकूंकवाचा कार्यक्रम आयोजीत करता येत नाही. परंतु तो सर्वांच्या सोयीनुसार करण्यातआला,दूसरे परिवर्तन म्हणजे धान्याची नासाडी होऊ नये म्हणून फूलांनी ओटी भरण्यात आली.तिसरे परिवर्तन म्हणजे निरुपयोगी वस्तूचे वाण न देता महापूरुषांचे पूस्तके वाणात देण्यात आली.तर चौथे आणि सर्वात क्रांतीकारी परिवर्तन म्हणजे विधवा महीलांनाही सूवानीसीएवढाच सन्मान देऊन हळदीकूंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली, ज्यामूळे आजही विधवा महीलांकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टीकोण आहे तो बदलण्यास सूरवात होईल.पूरोगामी महाराष्ट्रात म.ज्योतीराव फूले, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर , छ.शाहू महाराज, यांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिली खरी, परंतू समाज शिक्षीत झाला तरी अजूनही प्रथा परंपरा यांच्या जोखडातून बाहेर यायला तयार नाही.परंतू अंजनगाव सूर्जी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका मानकर, स्वाती मानकर, पल्लवी अढाऊ, सिमा बोके, शितल बोके, सविता बीजेवार,
यांनी समाजातील रुढी परंपराना झूगारुण समाजासमोर नविन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या परिवर्तनवादी हळदीकूंकवाचे संपूर्ण तालूक्यात आश्चर्य व्यक्त केल्या जात असून त्यांच्या या स्पृहणीय कार्याबद्दल त्यांचे अभिंनदनही केल्या जात आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply