nagpurruralNews

अखेर एच.जी.इन्फ्रा कंपनीने उपोषन कर्ताच्या सामोर टेकले घुटणे.

उपोषण कर्ताच्या सर्वच मागण्या मान्य युवक कॉग्रेसच्या चक्काजाम आंदोलनाला यश

29Views

वरुड :-

( तालुका प्रतिनीधी):-निलेश लोणकर

तालुक्या अंतर्गत येत असलेल्या चांदस (वाठोडा) येथील नागरिकांच्या विविध समस्या व प्रमोद कडू यांच्या घराला गेलेल्या तड्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पं.स. सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने चक्काजाम आंदोलन केले त्या मुळे एच जि इंन्फ्रा कंपनीचे एच आर पांडे यांनी पिडीताला नूकसाण भरपाई देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
सविस्तर माहीती नुसार एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या गलथान कारभाराने प्रमोद कृष्णरावजी कडू रा.चांदस (वाठोडा) यांच्या घराला तडा गेलेला असून घराची नुकसानभरपाई मिळण्यात यावी, याकरिता तहसील कार्यालय वरुड येथे दिनांक २० फेब्रुवारी २०१९ पासून प्रमोद कृष्णरावजी कडू यांचे आमरण उपोषण सुरू होते. पं.स.सभापती तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी चांदस (वाठोडा) येथे चक्काजाम आंदोलनाने उपोषणकर्ता प्रमोद कडू व चांदस (वाठोडा) वासीयांना मिळाला न्याय. चांदस (वाठोडा) वासीयांच्या चारही मागण्या मान्य.
त्यामध्ये उपोषणकर्ते प्रमोद कडू यांच्या एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले. ग्रामपंचायत चांदस ची एच.जी.इन्फ्रा कंपनीने उद्धस्त केलेली पाईपलाईन सात दिवसात पूर्ववत करून देणार.एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या रस्ता खोदकामामुळे ज्या घरांचे येण्याजण्याचे रस्ते बंद झाले ते सात दिवसांच्या आत तयार करून देणार. रस्त्याचे काम सुरू असेपर्यंत रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषण होऊ नये करिता दैनंदिन पाण्याचे टँकर निर्माणाधिन रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे काम सुरू राहील.
अशा प्रकारच्या चारही मागण्या घेऊन युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा पं.स.सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात चांदस (वाठोडा) बस स्टँड वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये चांदस (वाठोडा) येथील असंख्य महिला, पुरुष गामस्थ सहभागी झाले. पोलीस प्रशासनाने एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत व तहसीलदार, वरुड यांचेशी संपर्क करून परिस्थितीची माहिती दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply