EntertainmentNews

अनुराग कश्यपचा माफीनामा

48Views
मुंबई:-
 ‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याच्या प्रकरणावर आता दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. महिलेसोबत गैरवर्तणुकीच्या या प्रकाराची माहिती असतानाही आपण शांत राहिल्याची खंत व्यक्त करत त्याने जाहीरपणे पीडित महिलेची माफीही मागितली आहे.

अनुराग कश्यपने ट्वटिरच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करत लिहिले आहे की,’ मी फँटम कंपनीत चार भागीदारांपैकी एक होतो, परंतु, त्यावेळी विकास बहलला कंपनीतून काढून टाकण्याचे सामर्थ्य माझ्यात नव्हते. कंपनीची स्थापना होताना करारावर स्वाक्षरी करताना त्यांना सांगण्यात आले होते की कंपनीच्या संदर्भातील सर्व कायदेशीर प्रकरणं विकास बहल आणि त्याची कायदेतज्ज्ञांची टीम हाताळेल,त्यामुळे इतरांना आपल्या कामांकडे लक्ष देणं सोपं जाईल. महिला कर्मचाऱ्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मला समजल्यावर मी तातडीने ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली परंतु, या प्रकरणाबाबत आपण जास्त काही मदत करू शकत नाही असं उत्तर मला देण्यात आलं. मात्र, त्यानंतरही मी प्रयत्न करत राहिलो. शेवटी, आम्ही विकासला निलंबित केले. त्याला कंपनीत येण्यापासून किंवा कंपनीशी निगडीत कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापासून त्याला रोखण्यात आले’ असं कश्यपनी सांगितले.

या प्रकरणाबाबत मी खुलेपणाने लोकांशी बोलू लागले असेही अनुराग कश्यपनी सांगितले. ‘ज्यावेळी चित्रपटसृष्टीतील लोकांचे केवळ अफवांवर लक्ष होते. तेव्हा या प्रकरणाविरोधात मीडियामध्ये आवाज उठवणारा मी पहिला व्यक्ती होतो. या प्रकरणाबाबत माझ्या नावाचा उल्लेख न करता मी अनेक पत्रकारांना माहिती दिली. ‘मुंबई मिरर’मध्ये पहिल्यांदा विकास बहलचे नाव आणि या प्रकरणाची पहिल्या पानावरची बातमी मी दिलेल्या माहितीच्या आधारे छापून आली होती. विकास बहलने जे केलं त्याबाबत कंपनीच्या धोरणांमुळे आणि कंपनीशी असलेल्या करारामुळे मी कायदेशीररित्या काहीच करू शकलो नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवर त्या महिलेला मला जितकी मदत करणे शक्य होते तितकी मी केली.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply