News

अभद्र वर्तवनुक करणार्या वाहतुक निरीक्षकाची हकालपट्टी करा…

186Views

सावनेरः                                                                                                                                                                 
साहिल ढवळे सावनेर                                                                                                                                             महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सावनेर आगारातील वाहतुक निरीक्षक पदावर कार्वरत देवराव उर्फ बाबा भिंगारे यांच्या सततच्या अभद्र व्यवहारामुळे सावनेर तालुक्यातील पास धारक प्रवाशी विषेशतः शासकीय योजना सवलत प्राप्त पास धारकांना पास नुतनिकरण व इतर कामा करीता येणार्या विद्यार्थी विद्यार्थ्यीनींना तासन तास या नात्या कारणावरुण अरेरावी व अभद्र वागणूक देणारे वाहतुक निरीक्षक देवराव भिंगारे यांच्या कार्यशैलीच्या विरोधात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सदर विषयाची लेखी तक्रार आगार व्यवस्थापक श्री एस.ए.हुसेन यांना करुण विद्यार्थींनी व महिलांशी अभद्र वर्तवणूक करणार्या वाहतुक निरीक्षकाची तात्काळ बदली करण्याची मागणी नीवेदनातुन करण्यात आली आहे
वाहतूक निरिक्षक हे मागील तीन चार वर्षापासून सावनेर आगारात कार्यरत असुन आपल्या स्थानिक, राजनैतीक व संघटनेच्या नावाखाली आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली करीता प्रसिद्ध असुन वरिष्ठांचे आदेश न मानने,मनमर्जीने कार्य कार्य करणे ,पास धारक ग्रामीण विद्यार्थ्यांना अभद्र भाषेचा प्रयोग करणे या सारखे सततचे उपक्रम सुरु ठेवून संघटन व वरदहस्तांच्या पाठबळावर सावनेर आगारात ठाण मांडुन बसले आहेत.मागील15 दीवसा पासुन विद्यार्थींनींना पास देण्या करीता टाळाटाळ करीत असल्याने भालेराव हाय स्कूल व जवाहर कन्या विध्यालय सावनेर येथील शिक्षक ,शिक्षीका व पालक वर्ग व समाज सेवींनी आगार प्रमुख एस.ए.हुसैन यांच्याशी भेट घेऊन सदर पास देण्याकरीता टाळा टाळ करत असलेल्या कर्मचारी यावर चर्चा करुण तोडगा काढण्याचे निवेदन करुण ग्रामीण विद्यार्थ्यांनाहोत आसलेल्या त्रासाचे निवारण करण्याची विनंती केली असता मा.आगार व्यवस्थापक यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वर चर्चा करुण विद्यार्थ्यांना पास देण्यात हरकत नसल्याचे वरिष्ठांनी सुचविल्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे समाधान केले.व भिंगारे या
पालक,विद्यार्थी व शिक्षक पास तयार करुण घेण्याकरिता वाहतुक निरीक्षका कडे गेले असता त्यांनी चक्क जा ज्याच्या जवळ माझी तक्रार केली त्यालाच पास तयार करुण मागा असे बोलत चक्क पालक,महिला,विध्यार्थींनी व शिक्षकांना अभद्र भाषेत हुडकावून लावत आगर प्रमुखाचा आदेश झुगारुन लावल्यानी संतत्प वर्गानी सदर घटनेची माहीती आगार व्यवस्थापकाला देऊण अभद्र व्यवहार करणार्या वाहतुक निरीक्षक भिंगारे याची तात्काळ बदली करण्याचा सुर धरला असता आगर प्रमुखांनी त्यांची तात्काळ बदली सावनेर आगार रा.प.मंडळाच्या खापा येथे करुण सदर घटनेची लेखीने तक्रार वरिष्ठांना सुध्दा करण्याचे आश्वासीत करुण संतत्प वीद्यार्थी,पालक व शिक्षकांचे समाधान केले.
*या प्रसंगी नगर सेवक निलेश पटे,वरिष्ठ पत्रकार व समाजसेवी किशोर ढुंढेले,श्रीमती आर.ए.बर्वे,मुख्याध्यापीका जवाहर कन्या विध्यालय,सौ.सुनीता जुनघरे(शिक्षीका)भालेराव हाय स्कुल,जे.बी.गीरी,कु.पी.एस.धोटे,महेश देशमुख,सह शेकडो पालक,विद्यार्थी उपस्थित होते…

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply