News

अभिनंदन याचं ट्विटर अकाउंट बनावट!

12Views

नवी दिल्ली: –

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे मायदेशी आल्यानंतर देशभर जल्लोष साजरा होत असतानाच, त्यांच्या नावाने ट्विटर अकाउंट तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते ट्विटर अकाउंट बोगस असल्याचे सरकारी सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले.

विंग कमांडर अभिनंदन आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीचे छायाचित्र शनिवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे छायाचित्र शेअर करण्यात आले होते. त्याचवेळी अभिनंदन यांच्या नावाने तयार केलेल्या बोगस ट्विटर हँडलवरूनही हे छायाचित्र शेअर करण्यात आले. त्यानंतर या बोगस अकाउंटच्या फॉलोअर्सची संख्या हजारोंच्या घरात गेली होती.

एका तरुणानं बिंग फोडलं…

अभिनंदन यांच्या नावानं सुरू केलेले ट्विटर अकाउंट बनावट असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या आझमगढमधील एका तरुणानं पोलिसांना दिली होती. या बोगस ट्विटर अकाउंटची माहिती पोलिसांना दिली होती. या अकाउंटवरून अनेक ट्विट करण्यात आले होते. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचेही कौतुक करण्यात आले होते. मात्र, तरुणानं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवण्यात आले. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, ते ट्विटर अकाउंट बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply