News

अमित शहा साधणार हजार मान्यवरांशी संवाद; चार जिल्ह्याची बैठक असल्याने लातूर झाले भाजपमय

27Views

लातूर :-

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आगमनानिमित्त लातूर भाजपमय करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक चौक, रस्त्यावर पक्षाचे ध्वज लावण्यात आले आहेत. शहा पहिल्यांदाच लातूरमध्ये येत असून ते शहरातील एक हजार मान्यवरांशीही संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार याकडे आता लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारी लागले आहेत. यातूनच लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय शहा रविवारी (ता. ६) दुपारी येथे येत आहेत. या चार जिल्ह्यातील पाच हजार ७१३ बुथ कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. याला बूथ विजय अभियान पक्षाच्या वतीने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली या बूथ विजय अभियानाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक चौकात पक्षाचे चिन्हाचे कटआऊट, ध्वज लावण्यात आले आहेत. शहारातील दुभाजक देखील ध्वजाने भरून गेले आहेत. शहरात बॅनर्सही लावण्यात आले आहेत. फिर एक बार मोदी सरकार अशी टॅगलाईनही त्यावर देण्यात आली आहे.

या अभियानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून बूथ प्रमुखांना एक प्रकारे निवडणुकीच्या विजयाचा कानमंत्र दिला जाणार आहे. दरम्यान श्री. शहा हे शहरातील व्यापारी, वकिल, डॉक्टर, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील एक हजार मान्यवरांशी ते सायंकाळी सात वाजता दयानंद सभागृहात संवाद साधणार आहेत. गेल्या पाच वर्षाच्या प्रवासाचे अनुभव व पुढील पाच वर्षाच्या दृष्टीक्षेप यावर ते संवाद साधणार आहेत. शहा काय बोलणार याकडे आता लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply