News

अमेरिका लादेनला मारू शकते तर आम्हीही ते करू शकतो’

49Views

नवी दिल्ली:

‘अमेरिकेचे सैनिक पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन-लादेनला मारू शकतात तर भारत का करू शकत नाही. आजच्या काळात काहीही शक्य आहे,’ असं सूचक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे.

भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी आज पत्रकार परिषद घेतली. स्वसंरक्षणासाठी भारत कोणतंही पाऊल उचलू शकतो, असं जेटली यावेळी म्हणाले. हे सांगताना त्यांनी लादेनचा दाखला दिला. अमेरिकेच्या नेवी सील कमांडोंनी एबोटाबाद येथे जाऊन अल्-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खातमा केला होता. मारल्यानंतर अमेरिकेचे कमांडो लादेनचा मृतहेह सुद्धा घेऊन गेले. अमेरिका हे करू शकते तर आम्ही करू शकत नाही का? पूर्वी असं काही करणं म्हणजे कवीकल्पना वाटायच्या. पण आज तेही शक्य आहे,’ असं जेटली म्हणाले.

जेटली यांचं हे वक्तव्य मसूद अजहरवरील संभाव्य कारवाईशी जोडून पाहिलं जात आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर हा आहे. जगानं त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावा, असा भारताचा प्रयत्न आहे. मात्र, वेळ पडल्यास भारत त्याचा लादेन करू शकते, असं जेटली यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply