News

अमेरिकेचा पाठिंबा,डोवाल-पॉम्पिओमध्ये चर्चा.

34Views
दिल्ली: 

भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी बुधवारी रात्री टेलिफोनवर चर्चा केली आहे. या चर्चेअंती अमेरिकेने भारताच्या एअरस्ट्राइकला पाठिंबा दिला असून दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केलं आहे.

मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने जैशच्या तळांवर बॉम्बवर्षाव केला. त्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसली. त्यानंतर इम्रान खानने भारताला चर्चेसाठी निमंत्रण दिलं त्याचप्रमाणे युद्धाने काहीच साध्य होणार नाही असंही स्पष्ट केलं. या सगळ्याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री डोवाल यांनी पॉम्पिओ यांच्याशी चर्चा केली. पॉम्पिओ यांनी भारताच्या एअर स्ट्राइकला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी भारतीय उपखंडात शांतता राखा असे आवाहन केलं आहे.

पॉम्पिओ यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मुहम्मद कुरेशी यांच्याशीही चर्चा केली असून शांतता राखण्याचे आवाहन त्यांना केलं आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादाला संपवण्यासाठी प्रयत्न करा असा सल्लाही दिला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकला ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि फ्रान्सनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघांमध्ये या तीन देशांनी एकमताने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा ठराव ही पारित केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply