News

अयोध्या खटलाः आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी.

57Views
नवी दिल्लीः –
अयोध्या खटल्यावरील सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालयाकडून निश्चित करण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणातील याचिकांवर आता २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठ या खटल्यावर सुनावणी करणार आहे.
अयोध्या प्रकरणी २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र, घटनापीठातील सदस्य न्या. एस. ए. बोबडे सुट्टीवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. न्या. बोबडे सुट्टीवरून पतरले असल्यामुळे अयोध्या खटल्यावरील सुनावणी आता २६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. न्या. यू. यू. ललित यांनी या खटल्यातून माघार घेतल्यानंतर नव्याने घटनापीठाची स्थापना सरन्यायाधीश गोगोई यांनी केली. यामध्ये सरन्यायाधीश गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. व्हाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश नव्या घटनापीठात करण्यात आला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० रोजी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. २०११ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत वादग्रस्त जमीन जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply