News

अर्थच बदलला आहे अभिनंदन या शब्दाचा: मोदी

15Views

दिल्ली:

भारतीयांमध्ये इतकी क्षमता आहे की ते कोणत्याही शब्दाचा अर्थही बदलू शकतात. अभिनंदन या शब्दाचा अर्थ शुभेच्छा किंवा कॉन्ग्रॅज्युलेशन्स असा होता. आता मात्र या शब्दाचा अर्थ बदलला आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात ते एका सभेला संबोधित करत होते.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञान भवनात एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं कौतुक केलं आहे. ‘ अभिनंदन वर्तनाचे धैर्य अभिमानास्पद आहे. सर्व देशात त्याचं कौतुक केलं जातं आहे. ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून आलेल्या अभिनंदनने हे सिद्ध केलं आहे की एखाद्या शब्दाचा अर्थ बदलण्याची ताकद भारतीयांमध्ये आहे. कालपर्यंत अभिनंदन या शब्दाचा अर्थ कॉन्ग्रॅज्युलेशन्स होता. आता तो अर्थच बदलून गेला आहे.’ यासोबतच मोदींनी सरकारच्या स्वस्त गृह कर्ज योजनेच्या यशाचीही माहिती दिली. गृहकर्जावरील जीएसटीही फक्त १ टक्का करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

विंग कमांडर अभिनंदनची सुटका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून त्याचं स्वागत केलं होतं. त्याचप्रमाणे देशाला त्याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply