News

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक.

27Views

इचलकरंजी:-

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रसाद अनिल मोहिते (वय १९ रा. दत्तनगर गल्ली नं. १२) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दत्तनगर कबनूर परिसरात संशयित आरोपी प्रसाद हा पीडित मुलीच्या शेजारीच राहण्यास आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून प्रसाद घरात शिरला. त्याने मुलीशी अश्लिल चाळे सुरू केले. भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारचे नागरिक जमा झाले. घडलेल्या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी प्रसादला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाजीनगर पोलिसात त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायदा व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply