nagpurruralNews

अस्वलाशी झुंज देऊन वाचविले स्वत:चे प्राण.

देव तारी त्यास कोणमारी  : सायगांव शिवारातील घटना

9Views

नांद  : –

प्रतिनिधी:-राम वाघमारे

उमरेड वरून घरी परत येत असतांना रस्त्याशेजारील झुडपात बसून असलेल्या अस्वलाने अचानक पाठीमागून हल्ला केला. पायाच्या मांडीवर वरील भागाला पंजे मारून दाताने लचका घेतला. अशातच दुस-यांदा हल्लां करण्याच्या बेतात अस्वल असतांना हातात मोठा दगड घेऊन त्या अस्वलाशी दोन हात करीत हल्ला परतवून लावल्याची घटना सायगांव – पोळगाव मार्गालगत गुरूवारी सकाळी ८ :३० वाजताचे सुमारास घडली.

भंक्तदास पत्रूजी चुटे (४० ) रा. नांद असे हिमंतीने अस्वलाशी झुंज देणा-या नागरीकाचे नाव आहे. भिवापूर तालुक्यातील सायगांव, खापरी, भगवानपूर, सालेभट्टी,पोळगांव,नांद गावातील जंगल परीसरात मागील महिन्यापासून मोठ्या चार अस्वलाचे या गावाशेजारी वास्तव्य आहे.आजपर्यंत या परीसरातील शेतक-यांनी एकत्रीत येऊन अनेकदा या गावाशेजारी येणा-या अस्वलाला जंगलात हुसकावून लावले. पण जंगलातील पाणवठे आटल्याने जंगली श्वापदांचे वास्तव आता गावाकडे यायला लागले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांनमध्ये या जंगली श्वापदांची भिती निर्माण झालेली आहे. आता या ठिकाणी वावरणा-या या अस्वलाचे रोजच दर्शन होत असल्याची ओरड सूरू आहे पण वन विभागाला याचे कोणतेच सुतक नसल्याने दिवसेनंदिवस या श्वापदांच्या हल्ल्याला शेतकरी व नागरीक बळी पडत आहेत.

सदर जखमी भक्तदास नेहमीप्रमाणे उमरेड वरून  दररोज ये – जा करतो त्यांचे कुटूंब उमरेड येथे वास्तव्यास आहे शेतीतील कामे बघण्याकरीता तो घटनेच्या दिवशी सकाळीच नांद कडे निघाला असता पोळगांव सायगांव रस्त्यावर झुडपात काहीतरी हालचाल दिसली त्यामुळे तो मोटारसायकल घेऊन थांबला असता मागून काही अंतरावर शेतकरी आरडाओरडा करीत येत होते त्यामुळे काहीतरी घडले असल्याचा संशय आल्याने तो गाडीवरून खाली उतरला त्याच वेळी झूडपात दडून असलेली अस्वलाने भक्तदासवर प्राणघातक हमला केला व मांडीवर मासाचा लचका घेतला. त्यामुळे भक्तदास वर अचानक झालेल्या हमल्यामूळे त्याची भांबेरी उडाली. पण प्रसंगावधान साधून पळून न जाता त्याने मोठा दगड उचलून त्या अस्वलाशी दोन हात करीत हल्ला परतवून लावला.अस्वल व जखमी इसम हे पाच मीनीटे एकमेकासमोर उभे होते.दरम्यान अस्वलाला हुसकावून लावणारे शेतकरी त्या ठिकाणी पोहचले व भक्तदासच्या मदतीला धाऊन आले. त्यामुळे त्या अस्वलाने त्या ठिकाणाहून पळ काढला.

घाबरलेल्या व जखमी अवस्थेत भक्तदास गावाकडे परतला.व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले सद्ध्या जखमीची प्रकृती स्थिर जरी असली तरी तो अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहे.त्याला पुढील उपचाराची गरज आहे असे वैद्यकीय सुत्रानकडून माहीती मीळाली. दैव बलवत्तर होते म्हणून प्राणहानी झाली नाही.

त्या अस्वलाचा बंदोबस्त करा.

घटनेची माहीती मीळताच नांद येथिल सरपंच तुळशीदास चुटे,भगवानपूर येथील उपसरपंच रवी मुंगले  यांनी नव अधीका-यांना सूचना केल्या की या परीसरातील गावाशेजारी दररोज चार ते पाच अस्वली वावरतात अशी माहीती आहे. वरून वाघाची भीती तर आहेच पण या नव विभागाच्या वतीने या जंगली श्वापदांचा बंदोबस्तासाठी कीणीच सामोर येत नाही. त्यामुळे एख्याद्या नागरीकांची जिवीत हाणी होण्याची तर वाट पाहत नाही अशी शंका लोकमत जवळ उपस्थित केली.

त्या ठिकाणी असलेल्या अस्वलाचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकातुन व सर्वच त्ररातून  होत आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply