News

आंबेडकर-ओवेसींची उद्या नगरला सभा.

71Views

नगर :-

वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व ‘एमआयएम’चे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन जाहीर सभा शुक्रवारी (१ मार्च) दुपारी २ वाजता स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या सभेला ओवेसी येण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत आंबेडकर यांची चर्चा सुरू आहे; मात्र, जागा वाटपाबाबत अजून तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी व ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरात सभा घेण्याचा धडाका लावला आहे. यापूर्वी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर अकोले, अमरावती या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आहेत. आता नगरच्या सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे घाटत आहे. या सभेस ‘एमआयएम’चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, विजय मोरे, हरिभाऊ भदे तसेच भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनोने, प्रदेश सचिव अमित भुईगळ, वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते प्रा. किसन चव्हाण, नगर जिल्ह्याचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव, डॉ. जालिंदर घिगे, भारिपचे नगर-दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, अशोक आल्हाट, अशोक बर्डे, अण्णाराव पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

भारिप-बहुजन महासंघाचे शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, अ‍ॅड. रावसाहेब मोहन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले, प्रकाश वाघमारे, ‘एमआयएम’चे डॉ. परवेज अशरफी, सर्फरोज जहागीरदार, दादासाहेब साठे, सुरेश चव्हाण, दादासाहेब बागुल, विनोद गायकवाड, फिरोज पठाण, योगेश थोरात, जीवन कांबळे, शशिकांत मतकर, प्यारेलाल शेख आदींनी या सभेचे नियोजन केले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply