News

आजपासून ऑस्ट्रेलियन ओपन

25Views

मेलबर्न :-

रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे सातव्या ऑस्ट्रेलियन ओपनविजेतेपदासाठी प्रयत्न करणार असून नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारा अँडी मरे आपल्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार आहे. सोमवारपासून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. रफाएल नदालही मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. पण ब्रिस्बेन मधील सरावाच्या स्पर्धेतून त्याने माघार घेतली होती. आपण पूर्णपणे फिट असल्याचा दावा करत त्याने प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले आहे.

पहिले सीडिंग असलेला जोकोविच आणि तिसरे मानांकन असलेला फेडरर यांना युवा खेळाडू अॅलेक्झांडर झ्वेरेवसारख्यांच्या आव्हानाचा सामना करायचा आहे. अँडी मरेने स्पर्धेआधीच दुखापतीमुळे आपली निवृत्ती जाहीर केली आहे. दुःखावेगाने मरेने आपल्या निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पण अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सोमवारी फेडररचा सलामीचा सामना डेनिस इस्टोमिनशी होणार आहे. गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून जोकोविच व रॉय इमर्सन यांच्या सहा ऑस्ट्रेलियन विजेतेपदांशी बरोबरी केली होती.

पण जोकोविचला गेल्या वर्षी अपयश आले आणि त्यानंतर कोपराच्या दुखापतीवर शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यानंतरच्या खराब कामगिरीमुळे तो पहिल्या २० खेळाडूंतही स्थान मिळवू शकला नाही. जुलैमध्ये मात्र त्याने विम्बल्डन जिंकून पुनरागमन केले. मेलबर्नमध्ये यशस्वी होण्याचा त्याचा विचार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply