News

आजपासून ‘फुटपाथ रिकामे’ करो!

32Views

नागपूर:-

आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी जाहीर केल्याप्रमाणे बुधवार, १ ऑॅगस्टपासून शहरातील फुटपाथ मोकळे करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच आयुक्तांनी तसे जाहीर केले होते. त्यानुसार यासाठीची कारवाई अपेक्षित आहे. एकीकडे धार्मिक स्थळांवरील कारवाईवरून शहरात संताप वाढत असताना फुटपाथ कारवाईमुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून ‘मटा’ने वृत्त प्रका शित करीत प्रशासनाला आठवण करून दिली. यासाठी कारवाईची सूचना निर्गमित करण्यात आली नसली तरी अल्टीमेटमचा कालावधी संपल्याने कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी माध्यमातून आयुक्तांनी दुकानदारांना फुटपाथ रिकामे करण्याचे आवाहन केले होते. ही मुदत संपत असून, आता रितसर १ ऑगस्टपासून कुठलाही मुलाहिजा न बाळगता फुटपाथ रिकामे करून साहित्य जप्तीसह दंड आकारला जाणार आहे. कारवाई होणाऱ्या मार्गावर कायमस्वरूपी नजर ठेवण्यात येणार आहे. पुन्हा पुन्हा अतिक्रमण करून फुटपाथ बळकावण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात असलेल्या बाजारपेठेतील दुकानांसमोरील फुटपाथ व इतरही मार्गावरील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. पादचाऱ्यांचा हक्काचा मार्ग असलेल्या फुटपाथ शहरात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जागरूक नागपूरकरांमध्ये प्रशासनाबद्दल संतापही आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित करताना पादचाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याची भूमिका नागरिकांची आहे. त्यामुळे ‘फुटपाथ रिकामे करावे. अतिक्रमण हटवावे,’ अशी मागणी जोर धरू लागली होती. अ धिवेशनापूर्वी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी तशी घोषणा केली होती. त्यानुसार ही कारवाई अपेक्षित आहे. खामला, कमाल टॉकिज रोड, सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान, सदर हेच भाग नव्हे तर शहरभर फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या कारवाईत एकदा दंड केल्यानंतर नोटीस देऊन समज देण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा फुटपाथ व्यापल्याचे दिसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. झोनहिनाय ही कारवाई करण्याचे अपेक्षित आहे.

 

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply