News

आज भाजपही पहिली यादी जाहीर करणार आहे.

12Views

दिल्ली: –

काँग्रेस,तृणमुल काँग्रेस आणि देशातील इतर पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज
भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आज जाहीर करणार आहे. या यादीत १८८ नावांचा समावेश असून महाराष्ट्रातील काही दिग्गज नेत्यांचेही या यादीत नाव असू शकते अशी चर्चा सुरू आहे.

१० मार्च ला निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आणि सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेळ आला. देशातील अनेक पक्षांनी एक दोन दिवसांतच उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेस पक्षाने १५ मार्चपर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
पण सत्ताधारी भाजपचे उमेदवार कोण असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. यासंदर्भात आज दुपारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून १८८ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र,मध्यप्रदेश, ओडिशा आणि आसाम या राज्यातील उमेदवारांची नावं असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ११ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान जिथे निवडणुका होणार आहेत त्या सर्व मतदारसंघामधील उमेदवारांची नावं भाजप जाहीर करू शकतं.

‘ आमचा मतदारसंघ बदलून द्या’
भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर करणार असलं तरी आम्हाला आमचा विद्यमान मतदारसंघ बदलून द्या अशी मागणी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक खासदारांनी केली आहे. शुक्रवारी या सर्व खासदारांनी पक्षाध्यक्ष अमित शहांची भेट घेतली. मतदारसंघातील असंतोषामुळे या खासदारांनी ही मागणी केली आहे. आपण परत निवडण्याची शक्यता कमी असल्याचंही त्यांनी शहा यांना सांगितलं आहे. आता यावर भाजप काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply