nagpurruralNews

आता या सरकारला राज्यातून हद्दपार करणार खासदार अशोक चव्हाण रामटेकच्या सभेत गरजले.

20Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-ललित कनोजे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी नागपूर हुन निघालेली जन संघर्ष यात्रा आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रामनगरीत पोहोचली. त्यावेळी जनतेने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.यावेळी विशाल सभेला संबोधित करताना आतापर्यंतचे राज्यातील व केंद्रातील हे सर्वाधिक भ्रष्ट सरकार असून जुमलेबाजांचे सरकार असल्याचा आरोप केला. 2014 ला निवडणुकीच्या पूर्वी दिलेले कोणतेही आश्वासन त्यांनी पाळले नाही. सर्वसामान्य माणूस अडचणीत आला आहे. या राज्यात केलेली कर्जमाफी फसवी आहे. असे अनेक प्रकारचे आरोप यावेळी चव्हाण यांनी राज्य व केंद्र सरकार विरूद्ध केलेत.येणारा काळ हा कॉंग्रेसचाच असून केंद्रामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भक्कम सरकार आल्याशिवाय राहणार नाही.आता या सरकार ला राज्य व केंद्रातून हद्दपार करणार असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सावनेरचे आमदार सुनील केदार यांचीही यावेळी तडफदार भाषणे झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविक भाषणात ऊन नागपूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी विद्यमान राज्य सरकारचा समाचार घेतला व जनसंघर्ष माध्यमातून या सरकार विरुद्ध असलेला आक्रोश गोळा करण्यासाठी ही यात्रा असल्याचे त्यांनी नमूद केले दुपारी अडीच वाजता होणारा कार्यक्रम सुपर मार्केट येथील जाहीर सभा तब्बल चार तास उशिरा सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली रामटेक विधानसभा क्षेत्र नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते नेते यानिमित्ताने दाखल झाले होते. या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन उदय सिंह यादव यांनी केले कार्यक्रमाचे संचालन युवा नेते सचिन यांनी केले. मंचावर मुकूल वासनिक, राधाकृष्ण विखे पाटील, अनंतराव घारड, विजय वडेट्टीवार,वसंत पुरके, माणिकराव ठाकरे,राजेंद्र मुळक,चंद्रपाल चौकसे, अमोल देशमुख,आनंदराव देशमुख,दयाराम भोयर,सुरेश कुमरे,मुजिब पठाण, तुळशीराम काळमेघ, गजानन भेदे,लक्ष्मण उमाळे,तक्षशिला वाघधरे,शांता कुमरे आदी पदाधिकारी हजर होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply