nagpurruralNews

आमदार सुनील केदार यांच्या जनता दरबारात उसळली समस्यांची गर्दी.

हजारो नगरवासींनी घेला लाभ... प्रसिद्ध करीता नव्हे तर समस्या सोडविण्या करीता आयोजन (आमदार सुनील केदार)... अनेक समस्यांचे झाले तत्काळ निराकरण.

13Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

सावनेर दि.7मार्च रोजी नगपर परिषद सावनेर च्या नगर भवनात क्षेत्राचे आमदार सुनिल बाबु केदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत जनता दरबारात अनेक ज्वलंत समस्यांची एकच गर्दी उसळली.
सावनेर शहर वासीयांच्या समस्यां सोडविण्या करीता शहर काँग्रेस कमेटी व काँग्रेस नगरसेवक यांनी जनता दरबार आयोजित करुण आमदारांच्या पुढाकाराने गावकर्यांना न्याय मीळवून देण्याच्या प्रयत्नास नगरीतील हजारो महिला पुरुष नागरिकांनी घरकुल,पट्टे वाटप,संपती फेरफार,वाढिव घर टँक्स,पीण्याचे पाणी,साफ सफाई,अठवडी व नियमित बाजार,क्रीडा पटांगण,विद्युत व्यवस्था,अवैध लेआऊट,रडखडलेल्या भुमीगत विद्युत योजना,वाढिव विद्युत बील व पुरवढा, बीपीएल,अंतोदय राशन कार्ड,संजय गांधी,श्रावण बाळ योजना,नवीन घर टँक्स आकारणी,पहलेपार येथील खंडतर झालेले समाज भवन,नवीन पीण्याच्या पाण्याच्या टाकी,स्वच्छता अभीयानात उधडलेला नीधी ईत्यादी विषयांवर शेकडो च्या वर नागरिकांच्या समस्येचे निराकरण करुण गोर गरीब जनतेस एकाच ठीकाणी कमी वेळेत न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सदर जनता दरबारातुन झाले..
सदर जनता दरबारास नगर पालिका सावनेर चे सर्व विभाग, तहसील कार्यालय,विद्युतविभाग,आरोग्य विभाग,पोलीस विभाग,भुमी अभिलेख,बांधकाम विभाग ईत्यादीचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामुख्याने उपस्थित राहुन नागरीकांच्या समस्या जाणून निराकरण करण्यात येत असलेल्या समस्या तात्काळ निकाली काढल्या तर त्रुटीपुर्ण तक्रारी लवकरच कागदोपत्री पुर्ताता होऊण निकाली काढल्या जाणार असल्याने उपस्थित समस्याग्रस्त नागरिकांन मधे उत्साहाचे वातावरण निर्माण होते…
याप्रसंगी आमदार सुनील बाबु केदार यांनी आपले मनैगत व्यक्त करीत सावनेर करांना होत असलेल्या समस्यां तसेच पस्त झालेल्या भुमीगत गटारी योजना,भुमीगत विद्युत योजना,सिमेंटरस्ते बाधकामात झालेला व होत असलेल्या दिरंगाई वर सत्ता पक्षाचा खरपुस समाचार घेत गोर गरीब नागरिकांना अवाढव्य घर टँक्स,रडखडलेली पेयजल व्यवस्था,घरकुल योजना सारख्या सामान्य योजनेचा लाभ मीळवून घेण्या करीता दीवसेंन दिवस नगर पालिका व संबंधित विभागाच्या चकारा माराव्या लागतात त्यांच्या समस्या कुठेतरी सामुहिक स्तरावर एकाच ठिकाणी व कमी वेळात सोडवीने या हेतुनेच या जनाता दरबाराचे आयोजन करण्यात आले असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पवन जैस्वाल,नगर काँग्रेस कमेटीचे सचिव विजय बसवार,तहसीलदार दिपक करंडे,मुख्याधिकारी टाकळखेडे प्रामुख्याने उपस्थित होते…
सदर आयोजनाच्या यशस्विते करीता नगर सेवक सुनील चाफेकर,दिपक बसवार,निलेश पटे, लक्ष्मिकांत दिवटे,मनोज बसवार,चंदु कामदार,अश्वीन कारोकार.सचिन लिडर,आदींनी परिश्रम घेतले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply