News

आयफोनसाठी १७ वर्षीय मुलानं विकली किडनी

16Views

नवी दिल्ली 

मोबाइलचे व्यसन लागल्याने तरुण पिढीला दुष्परिणामांना सामोरं जावं लागत असतानाच चीनमधील एका तरुणानं आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणानं किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. परंतु, आता या तरुणाला त्याची चूक समजली असून तो गेल्या सात वर्षांपासून अंथरुणाला खिळून पडल्याने मरण यातना भोगत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या जिओ वँग नावाच्या एका तरुणानं सात वर्षापूर्वी ‘आयफोन-४’ खरेदी करण्यासाठी स्वतःची किडनी विकली होती. ‘आयफोन-४’ ज्यावेळी लाँच झाला त्यावेळी जिओ वँग अवघ्या १७ वर्षाचा होता. व तो विद्यार्थी होता. त्यावेळी शाळेत आयफोन म्हणजे प्रतिष्ठा समजली जात होती. आयफोन विकत घेवून मित्रांमध्ये शायनिंग मारण्यासाठी त्यानं किडनी विकण्याचा निर्णय घेतला. वँगने एक किडनी ३,२०० अमेरिकन डॉलरला म्हणजेच २,२३,२६५ रुपयांना विकली. त्यातून त्यानं ‘आयफोन-४’ खरेदी केला. वँग आता २४ वर्षाचा आहे.

एक किडनी काढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट आठवडाभरानंतर तो पूर्वीसारखाच तंदुरुस्त होईल, असे वँगला सांगण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याला किडनीची शस्त्रक्रिया करताना संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या ७ वर्षापासून तो अंथरुनाला खिळून पडला आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आता त्याच्या कुटुंबाकडे पैसेही नाहीत. कुटुंबानं बराच खर्च केल्यानं तेही कर्जबाजारी झाले आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात वँगने कुटुंबाला काहीही माहिती दिली नव्हती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply