News

आयुध निर्माण अंबाझरी मध्ये प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन.

सैनिकांना लागणाऱ्या शास्त्राची भव्य प्रदर्शनी

17Views

बाजारगाव:-

प्रतिनिधी:-गजेंद्र डोंगरे
आयुध निर्माणी अंबाझरी मध्ये आयुध निर्माण दिवस थाटात साजरा झाला प्रत्येक वर्षी 18 मार्चला संपूर्ण देशात वेगवेगळ्या आयुध निर्माण कंपनीमध्ये आयुध निर्माणी दिवस साजरा केला जातो .

देशात पहिली आयुध निर्माण कंपनी बंदूक व सेल फॅक्टरी काशीपूर मध्ये स्थापन झाली याच आधारावर अंबाझरी आयुध निर्माण कंपनीमध्ये तापला दिवसाचे औचित्य साधून 17/ 3/ 2019 ला कंपनीतर्फे सकाळी सहा वाजता डॉक्टर आंबेडकर चौक पासुन कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये कंपनीचे कर्मचारी अधिकारी वर्ग तसेच त्यांच्या परिवाराने मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली यामध्ये प्रभात फेरी चे शुभारंभ सी एल मौर्य महाप्रबंधक यांनी केले त्यानंतर कंपनीच्या ध्वजारोहण करण्यात आला यामध्ये संघटन वचनबद्ध राहण्याचा शपथविधी पार पडला यानंतर 2:30 ला प्रदर्शनीचे कंपनीच्या परिसरात समाज सदर हॉलमध्ये उद्घाटन करण्यात आले प्रदर्शनीचे उद्घाटन महिला कल्याण समिती अध्यक्ष वंदना मोरया यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये आयुध निर्माणीच्या उत्पादन व शस्त्राला लागणारे उपकरण यांची प्रदर्शन करण्यात आली यामध्ये विविध प्रकारचे हार्डवेअर वस्तू, मेकॅनिकल, फिउज सेल, ॲल्युमिनियम, कास्टिंग ,रॉकेट ,अशा विविध वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आला कंपनी परिसरातील तिला आजूबाजूच्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी आयु डिझाईन सेंटर च्या अंतर्गत सेंटर फॉर डिझाईन अँड डेव्हलपमेंट यांचा मुख्य सभागृहाला तसेच कंपनीचे सर्व अधिकारी यांचा पण मुख्यतः सहभाग राहिला

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply