nagpurruralNewsUncategorized

आरोग्य विभाग लागला उंदीर गोळा करायला!

49Views

जलालखेडा ता. १२

डा ता. १२
योगेश चौरे
नरखेड तालुक्यात स्क्रब टायफसने दोघांचा मृत्यू झाला तर अनेक रुग्ण उपचाराकरिता विविध दवाखान्यात दाखल आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात याचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. हा रोग चीगर हा कीटक चावल्यामुळे होते. असे तरी सध्या सांगण्यात येत आहे व हा कीटक उंदीर, घूस व मुंगुस या प्राण्यांवर प्रवास करतो व हे प्राणी मानवाच्या संपर्कात आले तर तो कीटक चावल्याने स्क्रब टायफस होतो. असे असली तरी याचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी दिल्लीची चमू मागि काही दिवसांपासून यावर अभ्यास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून वैद्यकीय अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीने नरखेड तालुक्यात भेट देऊन जे रोगी या आजाराने ग्रस्त झाले होते त्यांच्या घरी उंदीर पडकण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. म्हणजेच आरोग्य विभाग लागला उंदीर गोळा करायला अशा चर्चेला ऊत आले आहे.
स्क्रब टायफस दोन मृत्यू झाल्याने नरखेड तालुका हादरला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती सध्या नागपूर जिल्ह्यात आहे. याची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. हा आजार आता पर्यंत कागदोपत्री कसा होतो. हेच सांगण्यात येत आहे. पण याचे नेमके कारण काय? हा कोणत्या कीटक पासून होतो? हा कीटक कोणत्या प्राण्यांवर आढळतो. याचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली वरून शास्त्रज्ञांची चमू काही दिवसांपूर्वी नागपुरात दाखल झाली आहे व यावर अभ्यास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या चमूने आता जे रोगी स्क्रब टायफसचे आढळले. त्याच्या घरातील, शेजारील व शेतातील उंदीर पकडून त्यावर संशोधन करण्याचे ठरविले आहे. यामुळे आज ( ता. १० ) नागपूर येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप चौधरी, जीव शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद देशपांडे, प्रयोग शास्त्रज्ञ डॉ. संजय कार्देकर व कीटक संपहारक संजय मलवे यांनी नरखेड तालुक्यातील स्क्रब टायफसचे रुग्णांच्या घरी जाऊन चौकशी केली व उंदीर पकडण्यासाठी पिंजरे लावले. जलालखेडा येथील रामराव कनेरे यांच्या घरी जाऊन या चमूने माहिती घेतली व पिंजरे लावले. यावेळी त्यांच्या सोबत जलालखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे, आरोग्य सेविका जयश्री सावरकर व आरोग्य सेवक कळंबे उपस्थित होते.
उंदिरावर संशोधन करून पक्के निदान करणार….डॉ. संदीप चौधरी
स्क्रब टायफस हा रोग होतो हे खरे आहे. पण याचे नेमके कारण कागदोपत्री असले तरी मात्र हमखास पुरावे नाही. यामुळे दिल्लीची चमूने या रोगाचे कीटक उंदीर, घूस व मुंगुस या प्राण्यांवर प्रवास करतो. असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे जे रोगी या आजाराचे आढळले आहे. तेथील उंदीर पकडून त्यावर संशोधन करण्यात येणार आहे व त्यासाठी पशु वैद्यकीय महाविद्यालयाची प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. यामुळे नेमके कारण पुढे येईल. अशी माहिती नागपूर येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप चौधरी यांनी दिली आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply