News

आलिया गुंडी आहे: महेश भट्ट

24Views

मुंबई: –

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग याच्या ‘गली बॉय’ची प्रेक्षकांना खूपच आतुरता लागून राहिली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि त्यानंतर आता या ट्रेलरमधील आलियाच्या डायलॉगवर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलियाच्या या मीम्सवर इतरांप्रमाणे आलियाचे वडील महेश भट्ट देखील मजा घेताना दिसताहेत.

‘मेरे बॉयफ्रेंड से गुलू गुलू करेगी तो धोपटाऊंगी ना उसको’ हा आलियाचा डायलॉग सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतोय. ज्यावर रणवीर तिला गुंडी बोलताना दिसतोय. या डायलॉगवरही अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. यापैकी एक मीम्स महेश भट्ट यांनीही ट्विटरवर शेअर केला आहे. ‘आलिया गुंडी आहे’ असं त्यात म्हटलं आहे. यावरून खऱ्या आयुष्यातही आलिया गुंडी आहे, असंच त्यांना सुचवायचं असल्याचं बोललं जातंय.

‘गली बॉय’ येत्या १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं असून यात कल्की कोचलिन आणि विजय राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply