News

इतवारी ते केळवद ब्राडगेज रेल्वेसेवा सुरू.

खापरखेडा रेल्वे स्टेशनवर केले नागरिकांनी जोरदार स्वागत

32Views

खापरखेडा :-

प्रतिनिधी:-दिलीप गजभिये

एकशे दहा वर्षांपूर्वीची ब्रिटिश कालीन नेरोगेज रेल्वे सेवा बंद करण्यात आली. याठिकाणी नागपूर ते छिंदवाडा ब्राडगेज रेल्वे मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून इतवारी ते केळवद ब्राडगेज रेल्वे सेवा 23 फेब्रुवारी रोज शनिवार पासून सुरू करण्यात आली हे विशेष. रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असून पैशाची बचत होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी च्या अधिकाऱ्यांनी ब्राडगेज रेल्वे रुळाचे निरीक्षण मोटार ट्रालीने केले होते. निरीक्षण यशस्वी झाले. रेल्वे प्रशासनाकडून ब्राडगेज रेल्वे रुळावर सीआरएस स्पेशल ट्रेन इतवारी ते केळवद पर्यंत ट्रायल घेण्यात आली. इतवारी ते केळवद अंतर 48 किमी आहे. मात्र सीआरएस स्पेशल ट्रेनने 119 किमी प्रतिघंटा वेगाने केवळ 36 मिनिटात अंतर पूर्ण केले. सीआरएस स्पेशल मध्ये ऑस्सीलेशन मॅनिटरिंग सिस्टम (ओएमएस) रेल्वे रुळाची रेकार्डिंग करण्यासाठी लावण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांना कोणत्याही त्रुट्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे लवकरच ब्राडगेज रेल्वे सेवा सुरू होणार असल्याचा आशा पल्लवित झाल्या होत्या. अखेर इतवारी ते केळवद ब्राडगेज रेल्वे सेवा 23 रोज फेब्रुवारी शनिवार पासून सुरू होणार असल्याचे आदेश धडकले. इतवारी ते केळवद पर्यंत धावणारी रेल्वेचे खापरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान आगमन झाले. खापरखेडा परिसरातील नागरिकांसह खापरखेडा पत्रकार संघानी रेल्वे इंजिन चालक, टिकिट मास्टर, रेल्वे पोलीस, स्टेशन मास्टर आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. खापरखेडा ते केळवद स्टेशन पर्यंत रेल्वेचे प्रवास भाडे दहा रुपये आहे., तर खापरखेडा रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर ट्रेन दररोज इतवारी रेल्वे स्टेशन वरून केळवदला जाणारी खापरखेडा स्टाप घेत पहिली पॅसेंजर ट्रेन खापरखेडा रेल्वे स्टेशनवर ८:३४ ला येवून ८:४० ला सुटेल तर दुसरी पॅसेंजर १२:५४ ला येवून १२:५५ ला सुटेल.तर केळवद वरुन इतवारी रेल्वे स्टेशन जाणारी पॅसेंजर ट्रेन खापरखेडा ला तिसरी पॅसेंजर १०:५४ येवून १०:५६ ला सुटेल व चौथी पॅसेंजर १४:५९ ला येवून १५:०१ ला सुटून इतवारा रेल्वे स्टेशन प्रस्थान होईल.नाममात्र व स्वस्त परवडणारा सुरक्षित प्रवास असून ही रेल सेवा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी रिपाईचे चे नेते भाऊसाहेब बोरकर, जेष्ठ पत्रकार दिवाकर घेर,अमर जैन, सुनिल जालंदर, दिलीप गजभिये,कपिल वानखेडे, अशोक वंजाळ,बळी गायकवाड, किशोर बक्सरिया, अरविंद चिकणकरसह शेकडोंच्या संख्येत नागरीकांची उपस्थीती होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply