News

उमरखेड अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला

14Views

नागपूर:-

उमरेड पवनी करांडला वन्यजीव अभयारण्यात एक नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. काही पर्यटक सकाळी अभयारण्यात पर्यटनास गेले होते. त्यावेळी त्यांना चिंचगाव बीटजवळ वाघ आढळला. मात्र, त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याची माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता वाघ मृतावस्थेत आढळून आला. या वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाघाचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की त्याला जीवे मारण्यात आले, याचा तपास करण्यात येणार आहे. हा वाघ स्थलांतरीत होऊन या ठिकाणी आधीपासून असलेल्या वाघासोबत झालेल्या संघर्षात ठार झाला असावा अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply