News

एका चाहत्याने करिनाला ‘आंटी’ म्हटल्यानं ती खूप नाराज झाली असून त्याच्यावर चांगलीच संतापलेली दिसली.

10Views

मुंबई:- 

अरबाज खानचा आगामी वेब सीरिज शो ‘पिंच’मध्ये करिना कपूर दिसणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. या शोमध्ये करिना कपूर सोशल मीडियावर स्वतःला ट्रोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना दिसत आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने करिनाला ‘आंटी’ म्हटल्यानं ती खूप नाराज झाली असून त्याच्यावर चांगलीच संतापलेली दिसली.

आगामी वेब शो ‘पिंच’मध्ये करिना कपूर तिच्यासंबंधी आलेली एक कमेंट वाचताना दिसतेय. आधी स्मितहास्य करणारी करिना नंतर मात्र त्या चाहत्यावर चांगलीच संतापली. या चाहत्याने करिनाला उद्देशून एक कमेंट लिहिली होती. ‘आता तू एक ‘आंटी’ आहेस…एका तरूणीची भूमिका करणं बंद कर’, असं या चाहत्यानं म्हटलं होतं. चाहत्यानं ‘आंटी’ म्हटल्यानं करिनानं चाहत्याला चांगलेच खडसावले. प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री यांच्यात कोणतीही भावना नसते. आम्हाला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल, असं करिनानं म्हटलंय. वेब सीरिज ‘पिंच’ संबंधी करिना कपूरसह सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, सोनम कपूर आहूजा आणि कपिल शर्मा अरबाज खानसोबत चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान, सध्या करिना कपूर तिच्या आगामी ‘गुड न्यूज’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply