News

‘एचएएल’सोबत ४ वर्षात २६ हजार ५७० कोटी रुपयांचे करार: निर्मला सीतारमन

23Views

 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला दिलेल्या कंत्राटांबाबत कागदपत्रे सादर करावीत किंवा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली असतानाच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत स्पष्टीकरण दिले आहे. २०१४ ते २०१८ या कालावधीत ‘एचएएल’सोबत तब्बल २६ हजार ५७० कोटी रुपयांचे करार करण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे.

‘एचएएल’ या सरकारी कंपनीला १ लाख कोटी रुपयांची कामे दिल्याचे सीतारामन यांनी म्हटले असले तरी त्यातील एक रुपयाचे काम त्यांना मिळालेले नाही, असा आरोप राहुल यांनी केला होता. आपल्या उद्योजकमित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एचएएल’चा पैसा उधळला, असा आरोपही त्यांनी केला होता.

सोमवारी या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत उत्तर दिले. त्या म्हणाल्या, २०१४ ते २०१८ या कालावधीत ‘एचएएल’सोबत २६ हजार ५७०. ८० कोटी रुपयांचे करार करण्यात आले. तर ७३ हजार कोटी रुपयांचे करार होण्याच्या मार्गावर आहेत, असा दावा त्यांनी केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply