News

एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार फरहान अख्तर.

14Views

मुंबईः –

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचं नातं आता काही लपून राहीलेलं नाही. अलिकडेच फरहाननं पोस्ट केलेल्या एका फोटोमुळं त्यांनी साखरपुडा केल्याची चर्चा कलाविश्वात रंगली होती. आता ही जोडी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे. खुद्द फरहाननं तसे संकेत दिले आहेत. फरहानचा हा दुसरा विवाह असणार आहे.

एका कार्यक्रमादरम्यान फरहानला त्यांच्या आणि शिबानीच्या नात्याबद्दल विचारलं असतं त्यानं आम्ही एप्रिल किंवा मेमध्ये लग्न करण्याचा विचार करतोय अशी कबुली दिली आहे. रणवीर-दीपिका, निक- प्रियंकानंतर आणखी एक स्टार कपल लग्नगाठ बांधणार आहे.

फरहान आणि त्याची हेअरस्टायलिस्ट पत्नी अधुना भबानी यांचा घटस्फोट झाल्यानंतर फरहान आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीदेखील चर्चा होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply