News

‘ऑस्ट्रेलियाला लिंबू-टिंबू समजू नकोस’; हेडन सेहवागवर भडकला.

25Views

भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली. कसोटी आणि पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही भारताने जिंकली. या दौऱ्यात बॉक्सिंग डे कसोटीत एक वेगळेच स्लेजिंगचे सत्र सुरु झाले. ते सत्र होते बेबी सीटिंगचे… हे सत्र अजूनही सुरु असून ‘स्टार स्पोर्ट्स’ या वाहिनीने ऑस्ट्रेलिया – भारत मालिकेबाबत एक जाहिरात तयार केली आहे. त्यावरून सध्या ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन हा सेहवागवर प्रचंड चिडला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात बॉक्सिंग डे कसोटीत शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. पेनने यष्टीमागून पंतला ‘माझ्या मुलांचा सांभाळ करशील का?’ असे विचारले होते. त्यानंतर हे सत्र सुरूच राहिले. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीने तयार केलेली जाहिरात सध्या प्रचंड व्हायरल झाली असून यात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा ऑस्ट्रेलियाची जर्सी घातलेल्या लहान मुलांचे ‘बेबी सीटिंग’ करताना दिसत आहे.

‘आपण ऑस्ट्रेलियात गेलो, तेव्हा त्यांनी आपल्याला ‘बेबी सिटिंग’ करणार का? असं विचारलं होतं.आम्ही म्हटलं सगळेच्या सगळे या, आम्ही नक्कीच सांभाळ करू’, अशी जाहिरातीत सेहवागच्या तोंडची वाक्य आहेत.

मात्र ही जाहिरात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याला अजिबात रुचलेली नाही. त्याने या जाहिरातीबाबत वीरेंद्र सेहवागला सुनावले आहे. ‘ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तुम्ही लिंबू-टिंबू समजण्याची चूक करू नकोस. विश्वचषक कोणाकडे सर्वाधिक आहेत, ते लक्षात असू दे, असे त्याने म्हटले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply