nagpurruralNews

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारतानं ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

40Views

नागपूर:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतानं ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. संघ दबावामध्ये असतानाच चांगली कामगिरी करायची होती. याच संधीच्या शोधात मी होतो, अशी प्रतिक्रिया सामन्याच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना गारद करून विजय मिळवून देणारा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरनं दिली.

भारतानं प्रथम फलंदाजी करताना ४८.२ षटकांत २५० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ४९.३ षटकांत २४२ धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६ चेंडूंत ११ धावांची गरज होती. शेवटचं निर्णायक षटक टाकणाऱ्या विजय शंकरनं पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला (५२) तंबूत धाडून विजय निश्चित केला. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर त्यानं अॅडम झाम्पाला (२) त्रिफळाचित करून भारताला ८ धावांनी विजय मिळवून दिला. ‘माझ्यासाठी ही एक संधी होती. प्रामाणिकपणानं सांगायचं झालं तर मी याच संधीच्या शोधात होतो. मला अखेरचं षटक टाकायचं होतं. तेच माझ्या मनात होतं. मी आव्हान स्वीकारण्यास तयार होतो,’ असं विजय शंकरनं सांगितलं. ‘जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता त्यावेळी आव्हान स्वीकारण्यासाठी कायम सज्ज राहण्याची आवश्यकता असते. शेवटच्या षटकात मानसिकदृष्ट्या ते सिद्ध करण्याची गरज होती. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायची होती आणि मी ते करीन याची मला खात्री होती,’ असंही तो म्हणाला. दरम्यान, शंकरनं या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. १५ धावा देत २ फलंदाज बाद केले. तसंच ४६ धावाही केल्या.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply