nagpurruralNews

ओव्हरटेकच्या नादात कार व मिनी ट्रकचा अपघात.

गोंडखैरी परिसरातील पाल पेट्रोल पम्प जवळील घटना कार.. परिवारासह मोठी जिवीतहानी टळली..

12Views

बाजारगाव:-

प्रतिनिधी:-गजेंद्र  डोंगरे

नागपूर-अमरावती महामार्गावरील कळमेश्वर पोलीस ठाणाअंतर्गत गोंडखैरी परिसरात पाल पेट्रोल पम्प सामोर फन अॕन्ड फुड व्हिलेज बाजारगाव वरुन कार मधील परिवार पिकनिक करुन नागपूर मार्गाने जाणाऱ्या कार व (७०९ टाटा कंपनीची) मिनी ट्रक ओव्हरटेकच्या नादात जबर धडक दिली. यात कार मधील चार लहान मुलासह आई-वडील सुखरुप आहे. हा अपघात शुक्रवार १५ मार्चला सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडला.*
सविस्तर वृत्त.. एमपी ०४ सीडब्ल्यु ४८६३ क्रमांकाच्या कारने फन अॕन्ड फुड व्हिलेज बाजारगाव येथून अनुप दादुबीर पटेल (३२) सोमना अनुप पटेल (३०) गिरीष पटेल (३८) वंदना गिरीष पटेल (३२) यांच्यासह चार लहान मुले हे सर्व राहणार बनखेडी हुशंगाबाद (मध्य प्रदेश) येथील रहवासी असून केटी नगर नागपूर येथील रिस्तेदारांकडे चार दिवसांकरीता आले होते. पिकनिक म्हणून फन अॕन्ड फुड व्हिलेज बाजारगाव येथून नागपूर महामार्गाने जात होते. त्याच मार्गानी (७०९ टाटा कंपनी) मिनी ट्रक एमएच ३१ डब्ल्यु ४८३३ क्रमांकाचा उमेश जयदेव तिरपुडे (४०) राहणार आठवामैल हिलटाॕप काॕलनी, नागपूर मिनी ट्रक घेवून जात होता. कार नी ओव्हरटेकच्या नादात जाण्यासा निघतेवेळी भरधाव ट्रकनी मागून गोंडखैरी परीसरात पाल पेट्रोल पम्प सामोर धडक दिली. धडकेत कार चा टायर फुटला व ट्रकच्या सामोर आली. मिनी ट्रक चालकाने ब्रेक दाबून नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अपघात होताच स्थानिकांनी काही काळ वाहतुक थांबवून कार मधील चार लहान मुलासह आई-वडीलांना बाहेर काढले. व कार चालकांनी सुखरुप असल्याचे सांगितले. अपघाताची माहीती कळमेश्वर पोलीसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार मारुती मुळूक यांच्य मार्गदर्शनात हेडकाँस्टेबल दिलीप सपाटे, प्रकाश उईके घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने कार व मिनी ट्रकला रस्त्याच्या कडेला लावून वाहतुक सुरळीत केली. पुढील तपास सुरु आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply