nagpurruralNews

कपिलनगर येथे तीन दिवसीय निःशुल्क योगशिबीरांचे आयोजन..!

65Views

प्रतिनिधी-दिलीप ठाकरे

आज शनिवार दि २८ एप्रिलला सकाळी सहा वाजता  कपिल नगर येथे तीन दिवशीय निशुल्क योग्य विज्ञान शिबिराची दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात झाली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी सदिच्छा भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रांतीय चिकित्सक प्रकोष्ट प्रभारी आयुर्वेदाचार्य निलेश वानखडे, दिलीप गौर, प्रभाग क्र २ चे नगरसेवक  मनोज सांगोळे उपस्थित होते.आयुर्वेदाचार्य निलेश यांनी योग व आयुर्वेदाने कसे  निरोगी राहू शकतो याबद्दल माहीती सांगण्यात आली असून *ज्ञान मुद्रा, प्राण मुद्रा,अपान मुद्रा,हृद्य मुद्रा,पृथ्वी मुद्रा,सूर्य मुद्रा,वरून मुद्रा* याविषयी माहिती दिली. आमदार डॉ मिलिंद माने यांनी सर्वाना शुभेच्छा देत जास्तीत ज्यास्त संख्येने योग शिबिराला उपस्थित राहण्याचे आव्हाहन नागरिकांना केले. योगशिक्षक दिनेश राठी यांनी जलनेती,सूत्रनेती,रबर नेती चे प्रात्यक्षिक करून दाखविली. हिंगणा तालुका योग विस्तारक शुभम मिश्रा व रंजू ताई मिश्रा यांनी योग प्राणायाम घेतले. आयोजक विनायक बारापात्रे यांनी आभार मानले व शांतीपाठाने प्रथम दिवसाची सांगता झाली.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply