nagpurruralNews

काँग्रेसची जन संघर्ष यात्रा आज रामटेकात सुपर मार्केट मैदानावर होणार जाहीर सभा.

30Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरुद्ध जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भातील जनसंघर्ष यात्रा आज दिनांक 10 जानेवारी 2019 रोजी दुपारी दोन वाजता रामटेक येथे पोहोचत आहे.यानिमित्ताने रामटेकच्या सुपर मार्केट मैदानावर खासदार अशोक चव्हाण यांची जंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.नागपूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी ही माहिती पत्रपरिषदेत दिली. याबाबत माहिती देताना मुळक यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विविध भागात प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची जनसंघर्ष यात्रा संपन्न झाली असून पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ही जनसंघर्ष यात्रा दिनांक 10 जानेवारी 2019 ला दीक्षाभूमी नागपूर येथून सुरू होणार आहे.पुढे ही यात्रा ताजबाग,गणेश टेकडी येथून दर्शन घेऊन कामठी कडे प्रयाण करणार आहे . कामठी हुन पुढे कन्हान,आमडी, मनसर या मार्गाने दुपारी दोन वाजता रामटेक येथे पोहोचणार आहे.येथे यानिमित्ताने सुपर मार्केट मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यानिमित्ताने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रामटेकची जाहीर सभा आटोपल्यानंतर ही जन संघर्ष यात्रा पुढे तुमसर ला प्रस्थान करणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांची ही सभा जंगी होण्याच्या दृष्टीने रामटेक ते मनसर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स, बॅनर्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.रामटेक शहरातही ठिकठिकाणी या जाहीर सभेच्या संबंधाने पोस्टर्स बॅनर्स लावण्यात आले आहेत. पत्रपरिषदेला युवा नेते सचिन किर्पान, उदय सिंह यादव, रामटेक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नकुल बरबटे,शहराध्यक्ष इजराइल शेख,नगरसेवक दामोदर धोपटे,नितीन भैसारेे,भाऊ राहाटे, शांताराम बघेले, रामेश्वर खडसे आदी हजर होते.
रामटेकच्या जाहीर सभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह राज्यातील विद्यमान खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचे राजेंद्र मुळक यांनी यावेळी सांगितले

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply