News

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची ‘हातमिळवणी’ झाल्याची चर्चा.

43Views

नवी दिल्ली: –

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची ‘हातमिळवणी’ झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात आज दुपारी दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्या शीला दिक्षित यांनी आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. समान जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असं बोललं जातंय. दिल्लीत काँग्रेस आणि आप हे लोकसभेच्या प्रत्येकी ३ जागा लढणार असून, एक जागा अपक्ष उमेदवारासाठी सोडली जाणार आहे, असं वृत्त ‘टाइम्स नाउ’नं दिलं आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, ती एक जागा भाजपवर सातत्यानं टीका करणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी सोडली जाणार आहे. ‘आप’ने लोकसभा निवडणुकीसाठी ६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करून काँग्रेसवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडं मात्र काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी ‘आप’ उत्सुक होता.

३+३+१ च्या फॉर्म्युल्यावर मनं जुळली

काँग्रेससोबत आघाडी करण्यास ‘आप’ आधीपासूनच उत्सुक होता. आम्ही आघाडी करण्यास तयार असून, काँग्रेसच त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही, असं आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते. आता राजकीय ‘हवा’ बदलल्यामुळं काँग्रेसमध्येही आघाडीच्या चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये समान जागावाटपाच्या मुद्द्यावर एकमत झालं आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी ३ जागा लढतील आणि एक जागा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी सोडली जाईल, असं वृत्त आहे.

पंजाबमध्येही आघाडी होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतच नव्हे तर पंजाबमध्येही काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष आघाडी करण्यास उत्सुक आहेत. आपने पंजाबमधील १३ पैकी चार जागा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर उर्वरित जागा काँग्रेससाठी सोडण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply