News

काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला: खासदार काकडे.

11Views

पुणे :-

‘देशातील बदलती परिस्थिती पाहता मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत मी कालच वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असून उमेदवारी न मिळाल्यास पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून त्यासाठी काम करेन,’असे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केले.

देशासाठी एकाच घरातील तीन व्यक्तींनी बलिदान दिलेला कॉँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष आहे. या पक्षाला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. सर्व जाती धर्मांना कॉँग्रेस सामावून घेते. खेड्यातून शहराकडे आलेल्या कॉँग्रेसची विचारधारा आवडल्याने मी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत लवकरच माझा पक्षप्रवेश होईल,’असे काकडे म्हणाले.

बापटांशी लढाई सोपी

पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामधील कोणत्या उमेदवाराविरोधात निवडणूक अवघड वाटते, असे विचारले असता,‘गिरीश बापटांविरोधात लढायला मजा येईल. बापटांच्या कसबा विधानसभा मतदारसंघातच मी किमान ५० हजारांचे मताधिक्क्य घेईन, असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले.

देशात त्रिशूंक अवस्था ?

देशात निवडणुकीचे वातावरण पेटू लागले असले, तरी अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तविणे योग्य ठरणार नाही. मात्र, आत्ताची परिस्थिती पाहता देशात त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे, असे ‘भविष्य’ राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी रविवारी वर्तवले.

मुख्यमंत्र्यांशी मैत्री कायम राहील

काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबतचा निर्णय मी घेतला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीही बोलणे झालेले नाही. पक्षीय राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी असलेली मैत्री कायम राहील, असे संजय काकडे यांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply