nagpurruralNews

काटोल आगारात दोन शिव शाही दाखल ,प्रवाशांनी लाभ घ्यावा

399Views

चरणसिंह ठाकूर
काटोल/प्रतिनिधी/अनिल सोनक
नागपुर विभागाच्या काटोल आगारात दोन शिवशाही प्रवाशी बस गाड्या देण्यात आल्या असुन या बस गाड्या चा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे मत काटोल नगर परिषदेचे गट नेते चरणसिंह ठाकूर यांनी शिवशाही बस गाड्याच्या प्रवासी बस सेवा सुरू करन्या आधी आपले मत व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपुर विभागाचे विभाग नियंत्रक डी सी वरठी यांचे मार्गदर्शना खाली
काटोल आगारातुन आज दि.२९/४/२०१८ रोजी काटोल= चंद्रपुर ६.१५ वाजता व काटोल=अकेला ७.३० वाजता अशा दोन शिवशाही बस फेरी सुरु करण्यातआल्या असुन. सदर बस फेर्यांचे उद्घघाटण काटोल नगर परिषदेचे गट नेते चरणसिंग ठाकुर यानी केले प्रमुख उपस्थिति जितेंद्र तुपकर,उपाध्यक्ष नगर परिषद काटोल व अन्य नगरसेवकांचे उपस्थितित बस सेवा सुरू करन्यात आल्या .या प्रसंगी आगार व्यवस्थापक दिपक तामगाडगे, रमन मनकवडे, गजेंद्र फुलपेर व रा प कर्मचारी उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply