nagpurruralNews

काटोल मॅरेथॉन मध्ये ८७४ स्पर्धक  उत्साहाने धावले

स्पर्धकांनी दिला आरोग्यासाठी धावण्याचा संदेश  स्पर्धकांमध्ये मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

25Views

काटोल

प्रतिनिधी :- अनिल सोनक

दि. १३ जानेवारी २०१९ रोजी काटोल शहरात मॅरेथॉनचे भव्य व यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मुले तरुण-तरुणींसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोग्य, स्वच्छता, प्लास्टिक व प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा सर्वांनीच संदेश दिला.        शहरातील ऑरेंज प्लाझापासून माजी मंत्री अनिल देशमुख, ट्रान्स सायेबेरीयन रेस व रेस अक्रॉस अमेरिका विजेता डॉ.अमित समर्थ, कॉम्रेड रनर वैभव अंधारे, सायकलिंग सुपर रँनडर्स विजेता नितीन फुके यांनी हिरवी झेंडी दाखवून विविध गटातील स्पर्धकांना रवाना केले.

तीन किलोमीटरच्या विविध गटात वेदांत निंबुरकार, अर्णव केने, हिमांशू चौधरी, हुषाली उमाठे, तनु ठाकरे, श्रुती नासरे, विपुल बागडे, सरूसिंग बावा, निखिल खरपुरिया, यशोदा उमाठे,यशस्वी चौधरी नेहा पेठे, विशाल माकोडे, महेंद्र सुळे योगेश्वर शिरोडिया,राणी कुंभारे,प्रिया राऊत, यमु नंदघळे,संजय डेहनकर, अनिस अहमद खान, अभिनव सातपुते तेजश्री अतकरणे, नत्थु भाजीखाये, श्यामराव वानखेडे, गुलाबराव शेंडे

पाच किलोमीटरच्या विविध गटात यश वानखेडे, दक्षराज चौधरी, रितविज वानखेडे, समृद्धी बागडे,अद्विका गौरखेडे, प्रवृत्ती लोहे, गोकुल पांडे, कोमलसिंग बघेल, भारत साहू, रुचिता नासरे, प्रियंका गवळी, आयुश्री कर्वे, उमेश राऊत, अरविंद कावरे, आकाश जुगसेनीया, शितल राऊत, अपूर्वा जिचकार, रुपल वानखेडे, संध्या ढोले संध्या रेवतकर,

दहा किलोमीटरच्या विविध गटात प्रतिक सलाम, श्रीकांत उईके, तनवी मसराम, वैष्णवी सर्याम, भावी सलाम, नितेश काटवले, गजानन राऊत, गजानन हटवार, माया कवडके, रुचिका दियेवार रचना मानापुरे, पांडुरंग चोपडे, कमल साहू, बलजीत जूनेजा, घनश्याम पद्मगिरवार, चंदू भोंगाडे, दिलीप भारत, डॉ.दिवाकर भोयर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

माजी मंत्री अनिल देशमुख, नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबन लोहे, अनुप खराडे, गणेश चन्ने, राजेश डेहनकर,प्रशांत मोहोड, संदीप वंजारी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. पंच म्हणून डॉ. तेजसिंग जगदळे, प्रा.महेंद्रसिंग राठोड, डॉ. राजू कोत्तेवार,डॉ. मनोज वर्मा, प्रकाश अतकरने,धीरज ढोले, सचिन वाळके,मुकेश ठाकरे,परेश देशमुख, सचिन सोमकुंवर, सचिन सोनटक्के, राजेश नागपुरे,अरुण बागडे,अमित खांडेकर तुषार डोईफोडे तसेच मुख्य संयोजक प्रविण लोहे व निलेश चौधरी, राजेंद्र वानखेडे,प्रविण गोतमारे,डॉ. अमित बंड,अमित काकडे, प्रशांत पाचपोहर,अनिल धांडे, गोपाल गुप्ता,प्रशांत वानखेडे,राजेश वानखेडे व इतर मान्यवरांनी जबाबदारी सांभाळली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply