nagpurruralNews

किट्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सायबर गुन्ह्याविषयी पोलिसांची मार्गदर्शन कार्यशाळा

15Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-ललित कनोजे

नागपूर ग्रामीण पोलीस व स्थानिक रामटेक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंड सायन्स अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर गुन्ह्याविषयी जागरूकता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 5 जानेवारीला आयोजित केले होते.
यावेळी प्राचार्य डॉक्टर बी.रतनलाल,पोलीस निरीक्षक प्रकाश हाके,नागपूर ग्रामीण पोलिसांची सायबर चमु प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा खरसान, सपोनि वर्षा मते, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर यावेळी मंचावर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना एपीआय वर्षा खरात यांनी फिशिंग,हॅकिंग,नायजेरियन फ्रॉड,सायबर वुलिंग, डेटा थेप्ट,अफवा पसरविणे, क्रिप्टोग्राफी,सॉफ्टवेअर पायरसी, ब्लॅकमेलिंग,सायबर स्टॉकिंग,पोनोग्राफी, सोशल मीडिया, विवाह विषयक फेसबुक, पाठलाग करणे, लैंगिक छळ यांविषयी माहिती दिली. या विविध गुन्ह्यांविषयी जागृकता कशी घ्यावी व गुन्हे घडल्यास काय करावे? याबाबत सविस्तर माहिती देतांना पोलीस निरीक्षक प्रकाश हाके म्हणाले की 5 टक्के सराईत गुन्हेगारांमुळे लोकांची फसगत होते. अनोळखी माणसे परिसराची टेहळणी करून जातात. व यामुळे गुन्हे होतात.अशी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांचे वर्णना सहित पोलीस स्टेशनला कळवावे. ज्यामुळे होणारे गुन्हे रोखता येईल ते म्हणाले की सर्वात जास्त अपघातामध्ये हेल्मेट न वापरल्याने जीवित हानी होत असते.वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याची त्यांनी यावेळी विनंती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएट डीन डॉ. पंकज आष्टनकर,प्राध्यापक विलास महात्मे,प्राध्यापक सुधीर खरड, प्राध्यापक शांती स्वामी,वैशाली पांडे, नूतन सुपले यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन सुरेश्वरी बीचवे यांनी केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply