News

किती शेतकरी कर्जमुक्त झाले? शिवसेनेने विचारला बँकेला जाब.

14Views

औरंगाबाद :-

मराठवाड्यातील किती शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज केले, किती अर्ज मंजूर झाले, किती शेतकरी कर्जमुक्त असा जाब शिवसेनेने गुरुवारी बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला. बँकेच्या व्यवस्थापकाला घेराव देखील घालण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बँकेच्या व्यवस्थापकांना शिवसेनेने निवेदन दिले. नोव्हेंबर २०१८ या महिन्यातच शेतकऱ्यांच्या नावावर बँकेत पैसे जमा केल्याचे मंत्री सांगत आहेत, मग बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत रक्कम का जमा केली नाही. हजारो शेतकऱ्यांच्या रक्कमा बँकेत आलेल्या असताना त्याचे वाटप का केले जात नाही. शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जावर व्याज चालू आहे, असे असताना बँकेचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या नावाने आलेली रक्कम कुणाच्या हितासाठी वापरत आहे. सरकार खोटे बोलत आहे की बँकेची भूमिका शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी आहे, असे सवाल निवेदनात करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेली कर्ज माफी फसवी आहे का याचाही खुलासा करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

निवेदनावर कृष्णा पाटील डोणगावकर, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, गोपाळ कुलकर्णी, दिनेश मुथा, राजू वरकड, विजय वाघचौरे, सुभाष कानडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply