EntertainmentNews

कृष्णा राज कपूर यांचं निधन.

64Views

मुंबई: –

बॉलिवूडचे शोमॅन, दिवंगत अभिनेते राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर याचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८८ वर्षाच्या होत्या.

कृष्णा राज कपूर गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री रवीना टंडन आणि उद्योगपती सुहेल सेठ यांनी सर्वात प्रथम ट्विटरवर ही माहिती देत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. कृष्णा राज कपूर यांनी १९४६ मध्ये राज कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रितू नंदा आणि रिमी जैन ही त्यांची मुलं होतं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply