News

‘कोरेगाव भीमा’वर करडी नजर

14Views

 पुणे :-

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक आज (मंगळवारी) येणार असल्याने केंद्र आणि राज्य पातळीवरील सर्व गुप्तचर यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून परिसरात तळ ठोकून आहेत. गेल्या वर्षी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात असून, नक्षल प्रभावित भागातील गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत. केंद्र-राज्य स्तरावरील सुमारे दोनशे वरिष्ठ अधिकारी मंगळवारच्या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून असणार आहेत.

लाइव्ह अपडेट्स:

>> गेल्या वर्षी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरसुरक्षेसाठी इंटरनेट सेवा बंद

>> कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी

Embedded video

>> वाहनतळापासून टोल नाक्यापर्यंत जाण्यासाठी पीएमपी आणि खासगी बसच्या शटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

>> तब्बल ३५ पब्लिक ऍड्रेस सिस्टीम द्वारे पोलिसांकडून सूचना दिल्या जात असून गर्दी रेंगाळणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे

>> विजय स्तंभापासून ठराविक अंतरावर विविध पक्ष संघटनांच्या अभिवादन सभांसाठी मंडप टाकण्यात आले आहे

>> पेरणे फाटा येथे चारचाकी व टोल नाक्याजवळ दुचाकी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे

>> समता सैनिक दलाचे स्वयंसेवक जागोजागी उभे आहेत. नगर रस्त्यावरील जड वाहतूक खराडी बायपासमार्गे वळविण्यात आली आहे

>> कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीमसैनिक दाखल होत आहेत. गेल्या वर्षी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

 

>> कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

>> विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची पहाटेपासून रांग

View image on Twitter

>> भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले विजयस्तंभाला अभिवादन

>> कोरेगाव-भीमा परिसरात पाच हजार पोलिसांसह अन्य यंत्रणांची गस्त राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली आहे – संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण 

>> कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री अकरापासून वाहतूक व्यवस्थेत बदल

>> राज्य आणि केंद्रीय स्तरावरील अनेक गुप्तचर यंत्रणांचंही मंगळवारच्या अभिवादन सभेवर लक्ष

>> अभिवादन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी यंदा सुरुवातीपासूनच पोलिस आणि जिल्हा प्रशासनानं केलीय चोख तयारी

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply