News

कोर्ट नाराज, दुपारी पुन्हा सुनावणी

26Views

मुंबई :-

बेस्ट संपावर मुंबई हायकोर्टात सकाळी सुनावणी झाली. संप सुरू ठेवून तोडगा कसा काढणार. ही भूमिका चुकीची आहे. बेस्ट कामगार संघटनाकोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन करत नसून त्या कोर्टाचा अवमान करत आहेत, असं हायकोर्टाने यावेळी संपकरी कामगार संघटनांना सुनावलं. यावेळी महाधिवक्ते गैरहजर राहिल्याने या प्रकरणी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.

हायकोर्टात सुनावणीदरम्यान बेस्ट प्रशासनाने आपली बाजू मांडली. बेस्ट कामगार संघटनांशी चर्चेस तयार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तसंच राज्य सरकार कोर्टात काय भूमिका मांडतं याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply