nagpurruralNews

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त..!

मोफत शिक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय मोफत शिक्षण दिन साजरा..!

74Views

गोंडखैरी :- दिलीप ठाकरे ( प्रतिनीधी )

भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी मोफत शिक्षणाची गरज… इको निड्स फाऊंडेशन चे उपाध्यक्ष इंजिनियर राहुल लांजेवार यांचे प्रतिपादन…!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देशामध्ये सर्वांना मोफत शिक्षण मिळण्याकरिता इको निड्स फाउंडेशन तर्फे देशात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोफत शिक्षण मिळण्याकरिता जनजागृतीवर कार्यक्रमाची सुरुवात आज गोंडखैरी परिसरातील ग्रामपंचायत, नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह ठिकठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
परिसरातील खाजगी शाळा, अंगणवाडी शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली. सदर मोफत शिक्षण अभियानाचा उद्देश देशाची प्रगती होण्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. परंतु दिवसेंदिवस शिक्षणाचा फिस वाढत आहे. व दर्जा खालावत आहे. त्यामुळे देशांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहे. यासोबत शिक्षणाच्या सवलतीमुळे जातींमध्ये तेढ निर्माण होत आहे. परंतु देशात सर्वांना मोफत शिक्षण दिल्यास जातीजातीतील तेढ संपवुन जाईल. मोफत शिक्षणामुळे देशातील सर्व समाजांना समान संधी मिळेल त्यामुळे व्यक्तिगत व राष्ट्रीय विकास साध्य होणे शक्य होईल. यामुळेच ३/जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय मोफत शिक्षण दिन साजरा करण्यात आला. इको निड्स फाऊंडेशन मते देशात सर्वांना नर्सरी ते पीएचडी पर्यंत मोफत शिक्षण दिल्यास देशावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही.कारण सद्यस्थितीत एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क खाजगी संस्थांना दिले जाते. त्यामुळे खाजगी संस्थांना जवळपास ८० % टक्के निधी शासनातर्फे दिल्या जातो. फक्त केवळ २० % टक्के निधी वाढविल्यास देशातील सर्वांना शिक्षण मिळू शकेल. हा २० टक्के निधी भविष्यात मोफत शिकलेल्या शिक्षणामुळे नागरिकांकडून आयकराच्या माध्यमातून जमा होईल. यामुळे भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल असे मनोगत याप्रसंगी बोलताना इको निड्स फाऊंडेशन चे उपाध्यक्ष इंजिनियर राहुल लांजेवार यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी इको निड्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष इंजि.राहुल लांजेवार, सरपंच चांगदेव कुबडे, उपसरपंच मोहन झोडापे, सचिव हितेंद्र फुले, तलाठी केशव कुटे, नवभारत विद्यालयाचे मुख्यध्यापीका कल्पना उंदिरवाडे, विद्युत विभागाचे कर्मचारी, ग्रा.पं.सदस्यांसह शाळेतील व अंगणवाडीच्या शिक्षक-शिक्षिका व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला मोलाचे सहाकार्य केले

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply