nagpurruralNews

खापरखेडा पोलीस स्टेशन येथे विविध सणानिमित्त सुसंवाद सभा

59Views

दिलीप गजभिये
खापरखेडा: रिपोर्टर
खापरखेडा पोलीस स्टेशन येथे विविध सणानिमित्त कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये याकरिता सुसंवाद सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.यादरम्यान सभेचे अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीसचे अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून कामठी विभागीय पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातगडे व प्रमुख पाहुणे म्हणून मौदा पोलिस स्टेशन चे ठाणेदार शेख, कन्हान पोलिस स्टेशनचे ठाणेदार काळे व खापरखेडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अशोक साखरकर प्रामुख्याने उपस्थित होते.सभेदरम्यान आगामी येणारे ईद, गणेश चतुर्थी,पोळा व अन्य सणानिमित्त कामठी विभागीय अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरात कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये व आनंदाने सर्वांनी सण साजरे करावे या उदात्त हेतूने पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले असून जनतेनी सुद्धा पोलिसांशी सलोखा ठेवून सहकार्य करावे असे पोलिस विभागाने आव्हान केले आहे.या सभेत पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, गणमान्य नागरिक, शांतता कमेटी पदाधिकारीसह सदस्य, महिला दक्षता समिती पदाधिकारीसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदि उपस्थितांशी पोलिस अधिकाऱ्यांनी सुसंवाद साधला.यावेळी कामठी,कन्हान,मौदा , खापरखेडा येथील नागरिकांनी विविध सणानिमित्त शुभेच्छा देवून शांततेच्याप्रती आपआपले विचार व्यक्त केले. सभेचे संचालन खापरखेडा पोलिस निरीक्षक अशोक साखरकर तर आभार खापरखेडा पोलिस उपनिरीक्षक मीना बारंगे यांनी मानले.सभेला यशस्वी करण्याकरिता खापरखेडा पोलिसांनी अधिक परिश्रम घेतले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply