nagpurruralNews

खासदार चषक कबड्डी स्पर्धा आझाद क्रीडा मंडळ मानेगाव चे आयोजन.

17Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

ग्रामीण व शहरी भागातील महिला चमू सोबत 100 चमू चा सहभाग
सावनेर नजीक असलेल्या मानेगाव येथे दि.4.01.2019 ते 6.1.2019 पर्यंत 3 दिवसीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे सुरुवात क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाणे यांच्या हस्ते डॉ.राजीव पोतदार,माजी खासदार प्रकाश जाधव ,दादाराव मंगळे,सोनबाजी मुसळे,उत्तम कापसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सामन्याचे शुभारंभ करण्यात आले.
सदर सामन्यात जी आर सी आर्मी कामठी तसेच नागपूर, काटोल,सावनेर, कामठी, कळमेश्वर, खापरखेडा येथील चमू नि स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवित आहेत…
सदर सामन्यात महिलांच्या खुल्या गटातून15 तर पुरुष गटातून 60 किलो गटातील 50 व खुल्या गटातील 40 चमूने भाग घेऊन रंगत आणली,सदर सामने बघण्या करिता माणेगाव पंचक्रोषीतील क्रिडा प्रेमींनी तिन्ही दिवस एकच गर्दी करून आयोजकांच्या प्रर्यतनास यशस्वीता आणली हे विशेष…
कार्यक्रमाचे आयोजना करीता आझाद क्रीडा मंडळ मानेगाव चे अध्यक्ष जय जाधव,कार्याध्यक्ष गुणवंत गायकी,उपाध्यक्ष रमेश लोणकर, सचिव नारायण घ्यार परिश्रम घेत आहे…
सामन्याचे निर्णय पारदर्शक असावे या करिता क्रीडा असोसिएशन नागपूर चे चमू परिक्षकांची भूमिका निभावत आहे,खासदार चषक कबड्डी महिलांच्या सामन्यात त्रिरत्न महिला टीम कामठी यांना प्रथम तर साई क्रीडा मंडळ काटोल च्या चमू नि द्वितीय क्रमांक पटकवला,या सामन्यात खुल्या गटात प्रथम पुरस्कार 25000,द्वितीय पुरस्कार 15000,पुरुष गटात 60 किलो प्रथम पुरस्कार 15000,द्वितीय पुरस्कार 9000 तर महिला गटा मध्ये प्रथम 11000 तर द्वितीय 7000 बक्षीस ठेवले आहे

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply