nagpurruralNewsUncategorized

गणपती विसर्जनादरम्यान युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु.

फत्तेपुर येथील घटना.

32Views

वरूड :-

प्रतिनिधी:-निलेश लोणकर
तालुक्या अंतर्गत येत असलेल्या रोषनखेडा येथील राहुल पुंडलीक नेरकर हा स्वतःच्या घरील गणपतीचे विसर्जन करण्याकरीता सुरळी फत्तेपुर रोडवरील खदानमध्ये गेला असता खदानच्या साचलेल्या पाण्यात गणपतीची मूर्ती घेऊन मित्रासोबत गेला असता पाण्यात डूबकी मारली असता राहुल चा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली असुन रोषनखेडा गावामध्ये शोककळा पसरली आहे.घटनेची माहीती परीसरात पसरताच बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गावकऱ्याच्या मदतीने मृतदेह पाण्यातून काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेची माहीती पोलिसांना देण्यात आली असुन हेमराज नेरकर रा.रोषनखेडा वय ४८ वर्ष यानी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मृत्युची नोंद केली असुन पुढील तपास ठाणेदार दिपक वाणखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉस्टेबल अंबादास पडघामवार यांच्या सह वरुड पोलिस करीत आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply