nagpurruralNews

गोंडखैरी येथील सेवानिवृत्त शिक्षक माधव कांबळे यांना निरोप

एकुन २८० विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

20Views

गोंडखैरी :-

प्रतिनीधी-दिलीप ठाकरे

गोंडखैरी स्थानिक नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी व इतिहास विषयाचे सहाय्यक शिक्षक माधव भाकचरण कांबळे हे १/जुलै/१९८२ पासून सेवेत नियुक्ती झाली. व ३६ वर्षे पाच महिणे एक दिवस सेवाकाल झाला असून गुरुवार (२८/फेब्रुवारी) ला ते सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक माधव भाकचरण कांबळे हे राहणार चांदस-वाठोडा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील रहवासी असून १.जुलै.१९८२ साली नवभारत विद्यालयात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या आयुष्यांचे ३६ वर्षे पाच महिने एक दिवस या सेवाकालात इंग्रजी व इतिहास विषय विद्यार्थ्यांना शिकवून उच्च पदावर विद्यार्थ्यांना घडविण्यात आले. ते शांत स्वभावाचे व व्यक्तीशिरपणा निटनेटकेपणा व कार्यतत्परता, गुणांचा खजीना असे अष्टपैलु व्यक्तीमत्व मणमिळावू असून विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक म्हणून ओळखल्या जायचे. तसेच गावातील लग्नविधी, अंत्यविधी, धार्मिक, सामाजिक कार्यात नेहमी आवर्जून उपस्थित राहायचे. असे अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेले शिक्षक माधव कांबळे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या भावी आयुष्याला उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा प्राचार्य कल्पना उंदिरवाडे यांनी व्यक्त केली.
शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील विद्यार्थी, सरपंच, माजी विद्यार्थ्यांसह पालक यांच्या वतीने सपत्नीक त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला. या निमित्याने आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव अॕड. अभय गायकवाड, पालक प्रतिनीधी वसंतराव रोडे, विश्राम पोहन, पंचायत समीती सदस्य अजय वाटकर, माजी तथा नागपूर शाखेचे मुख्याधापक सुरेश बावणकर, सेवानिवृत्त मुख्यध्यापक उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाला सरपंच चांगदेव कुबडे, सेवानिवृत्त मुख्याधापक सुनिल लोंढे, अरुण गायकवाड, जयवंत भोसले, विद्यालयाच्या मुख्याध्यापीका कल्पना उंदिरवाडे उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षिका, शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तु देऊन सेवानिवृत्त शिक्षक माधव कांबळे यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थी व मान्यवराने आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सत्कारमुर्ती माधव कांबळे यांचे स्वागत करुन पाहुण्यांचे मनोगत नागपूर शाखेचे प्राचार्य सुरेश बावणकर व शिक्षकांचे मनोगत कमलाकर दुर्णे तर विद्यार्थ्यांचे मनोगत अक्षय वाडेकर, शितल धनगर यांनी केले. यावेळी शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक व गावातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापीका कल्पना उंदिरवाडे यांनी केले तर संचलन वैशाली महंत यांनी व आभार सुनिता खराडे यांनी मानले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply