nagpurruralNews

ग्रामविकास अधिकारी हटाव च्या घोषणेने गाजली जलालखेडा येथील ग्रामसभा

78Views

जलालखेडा :- योगेश चौरे (प्रतिनिधी)

· पोलीस बंदोबस्तात पार पडली ग्रामसभा
· माजी मंत्री व विद्यमान आमदार यांनीही भेट देवून गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
· विवाह नोंदणी होत नसल्याने अर्जदाराने ग्रामसभेत पुन्हा लावले लग्न
· खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांची ग्रामस्थांच्या तक्रारीवर योग्य निरसन केले
· कर भरल्याशिवाय दाखला दिला नाही म्हणून महिलेने विकले दागिने
· ग्रामविकास अधिकाऱ्याची मनमानी, सुट्टीच्या दिवशीही घेतली महिला ग्राम सभा

काल झालेल्या महिला आमसभेत जलालखेडा ग्रा.प. चे सचिव आनंद लोलुसरे यांनी अभद्र भाषेचा प्रयोग करीत अर्वाच्य शब्दात आमसभेत उपस्थित महिलांचा अपमान केला. अपमानानी शुब्ध व संतप्त महिलांनी ग्रा. प. कार्यालयाला कुलूप ठोकले व सचिव विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशन मध्ये सचिवा विरुद्ध तक्रार नोंदविली. त्याचवेळेस हा विवाद्ग्रस्त सचिव आनंद लोलुसरे हि आपल्या कु कृत्यावर पांघरून घालण्याच्या उद्देशाने गावातील महिलांविरोधात तक्रार देण्याकरिता पोलीस स्टेशन ला पोहचला. दोन्ही पक्षाची तक्रार घेतल्या नंतर गावातील काही गणमान्य व्यक्ती, ग्रा. प. सद्यस व ठाणेदार गजानन तामटे यांच्या सामंजस्य भूमिकेमुळे तात्पुरता वाद निवळला.

आज ग्रा.प. जलालखेडा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. काल झालेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत नरखेड प.स. चे खंड विकास अधिकारी दयाराम राठोड हे स्वतः आमसभेत उपस्थित होते. त्याठिकाणी गावातील महिला पुरुषांनी ग्राम विकास अधिकारी लोलुसरे हटाव जलालखेडा बचाव चा एकच नारा बुलंद केला. ग्रामवासियांनी व उपस्थित महिलांनी लोलुसरे यांच्या कु कृत्याचा पाढाच खंड विकास अधिकाऱ्या समोर वाचला. ख.वी.स. अधिकारी यांनी सामंजस्य भूमिका घेऊन काही प्रकरण योग्य रित्या हाताळले.

विवाह नोंदणी होत नसल्याने अर्जदाराने ग्रामसभेत लावले पुन्हा लग्न

गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांना वेळेवर प्रमाणपत्र व आवश्यक कागद पत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्रांसाठी वारंवार बोलाविणे, नियमाची आड घेत वेठीस धरणे अश्या शेकडो समस्यांचा डोंगर आमसभेत ग्रामवासियांनी उभा केला. गावातील नवविवाहित युवक युवतींचे लग्नाची नोंदणी न करणे अश्या कित्येक कारणाने ग्रामवासी त्रस्त होते असेच एक नवविवाहित जोडपे सुरेंद्र निकोसे व त्यांची पत्नी अश्विनी सुरेंद्र निकोसे नुकतेच एका महिन्या पूर्वी मंदिरात व निबंधकाकडे रीतसर विवाहबध्य झाले असून सुद्धा त्यांच्या विवाहाची नोंदणी करीत नसल्यामुळे या नवविवाहित जोडप्याने चक्क ख.वी.स अधिकारी व ग्राम वासियांसमोर आम सभेतच एकमेकांना वरमाला टाकून विवाह केला.

आजी व माजी आमदार पोहचले आम सभेत

जलालखेडा ग्रा. प च्या या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच या क्षेत्राचे माजी आमदार माजी मंत्री अनिल देशमुख व विद्यमान आमदार डॉ आशिष देशमुख यांनी गंभीर दाखल घेत सरळ जलालखेडा ग्रा.प. ची सुरु असलेली आमसभा गाठली. त्यांच्या समोरही उपस्थित महिलांनी व ग्राम वासियांनी सचिवाच्या अभद्र पणाचा व वेठीस धरण्याच्या कार्यप्रणालीचा पाढा वाचला. पूर्व मंत्री अनिल देशमुख यांनी बी.डी.ओ. ना या वादग्रस्त अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व जी. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी कार्यवाही संबंधी बोलण्याचे आश्वासन दिले. त्यापुढे जाऊन विद्यमान आमदार डॉ आशिष देशमुख यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क करून या वादग्रस्त सचिवाला तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले व तसेच नरखेड प.स. चे खंड विकास अधिकारी यांना या सर्व प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषद नागपूर चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश दिले.

महिलेने विकले दागिने

गावातील एका महिलेस मुलाच्या शिक्षणाकरिता बी.पी.एल. प्रमाणपत्र दाखल्याची गरज होती. तिने चालू वर्षाचा घर कर न भरल्याने तू आधी कर भर नंतर तुला दाखला देतो असे सचिव लोलुसरे यांनी त्यांना सांगितले व दाखला देण्याकरिता टाळांटाळीचे वर्तन अवलंबिले पण परिस्थितीमुळे ती महिला चालू वर्षाचे घर कर भरण्यास सक्षम नव्हती व घर कर भरला नाही तर प्रमाणपत्र मिळत नाही व प्रमाणपत्र मिळाले नाही तर मुलाचे शौक्षणिक वर्ष वाया जाते हि परिस्थिती असून सुद्धा लोलुसरे यांना त्या महिलेची कसलीही दया आली नाही शेवटी त्या महिलेला आपले सौभाग्य चिन्हाचे दागिने विकून घर कर भरावे लागले नंतरच लोळूसरे यांनी तिला बी.पी.एल. चा दाखला दिला .

ईदच्या दिवशी सुट्टी असूनही घेतली आम सभा

ग्रामसेवक संघटनेने सुट्टीच्या दिवशीही आम्हाला काम करावे लागते हि भूमिका घेतल्यामुळे शासनाने १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला होणाऱ्या अनिवार्य आमसभा रद्द केल्या तरीही ग्राम विकास अधिकारी लोलुसरे यांनी गावातील एका वर्ग विशेष च्या महिला आमसभेत उपस्थित राहू नये म्हणून हेतूपुर्सर पणे बकरी ईद च्या दिवशी महिला आमसभेचे आयोजन केले त्यामुळे मुस्लीम समाजाच्या महिला आम सभेत उपस्थित होऊ शकल्या नाहीत. म्हणून याची दखल घेत सचिवावर कार्यवाही करण्याची एकमुखी मागणी ग्रामवासियांनी केली.

तगड्या पोलीस बंदोबस्तात पार पडली आमसभा

नेहमी शांततेत पार पडणारी जलालखेडा येथील आमसभा आज या विवाद्ग्रस्त ग्राम विकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणाली मुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पूर्ण गाव तापलेले पाहता जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन तामटे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता पोलिसांची इतकी मोठी संख्या पाहता ग्राम वासियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते . परंतु माजी व आजी आमदार आल्यानंतर ग्रामवासियांना धीर आला व आमसभा दहशतीच्या वातावरणात पार पडली.

अन्यथा उग्र आंदोलन

या वादग्रस्त व जनतेस वेठीस धरणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याची त्वरित उचलबांगडी न केल्यास ग्रामवासियांनी उग्र आंदोलनाचा व मुख्य कार्यपालन अधिकारी जी.प. नागपूर यांच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply