nagpurruralNewsUncategorized

चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत दोन वाघांचा मृत्यू

45Views

चंद्रपूर:-

अवनी वाघिणीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच चंद्रपूरमध्ये बल्लारपूर एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे बछडे आठ ते दहा महिन्याचे असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
चंद्रपूरच्या जुनोना जंगल परिसरात ही घटना घडली. जंगलपरिसरातील रेल्वे रूळ ओलांडताना बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरखाली या दोन बछड्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली. या जंगलपरिसरातूनच रेल्वे रूळ टाकण्यात आला आहे. त्यामुळे अनेकदा रेल्वे रूळ ओलांडून जात असताना वन्य प्राण्यांना रेल्वेखाली जीव गमावावा लागतो. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply