News

चंद्रपूर शहर; पारा @ ४७.३

67Views

 नागपूर :-

चंद्रपुरातील तापमानाने ४७.३ अंश सेल्सियस तापमानासह या मोसमातील उच्चांक गाठला. विदर्भात अमरावती, बुलडाणा, नागपूर आणि वर्धा वगळता सगळ्याच शहरांमधील तापमानाने शुक्रवारी यंदाच्या मौसमातील उच्चांक गाठला आहे. हवामान खात्यानुसार शुक्रवारी चंद्रपूर हे देशातील हॉटेस्ट शहर होते.

गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. विदर्भातील विविध ठिकाणी प्रचंड ऊन अनुभवास येऊ लागले आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात जवळपास ९ जणांना उष्णाघातामुळे आपला जीव गमवावा लागला. उकाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरात शुक्रवारी ४७.३ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांमध्ये चंद्रपुरात तब्बल १.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची वाढ झाली आहे. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश, अकोला, वर्ध्यात ४५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद शुक्रवारी करण्यात आली. केवळ नागपुरातील पाऱ्यात गेल्या २४ तासात .०५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाने घट झाली. नागपुरात ४४.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. उपराजधानीत संध्याकाळी किंचित ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पारा घसरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु दिवसभर नागपूरकरांच्याही अंगाची लाहीलाही झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून येत होते. शनिवारीसुद्धा विदर्भावर सूर्यदेवाचा कोप राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या तापमानापासून अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या सुमारास उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले. आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, लहान मुलांची विशेष काळजी घ्या, काही तरी खाऊन अथवा दोन ग्लास पाणी पिऊनच घराबाहेर पडावे. ऊन्हात फिरल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण एकदम कमी होते. अशावेळी लिंबू सरबत, टरबूज, खरबुजाचा वापर करावा. उघड्यावरील अन्न खाऊ नये. विशेषत: बर्फाचे पाणी किंवा त्यापासून बनविलेले आइस्क्रीम खाऊ नये. त्यामुळे गॅस्ट्रो किंवा टायफाइड होण्याची शक्यता असते, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply