News

चंद्राबाबू नायडूंचा मोदींना इशारा,आश्वासन पूर्ण करा अन्यथा कसं करुन घ्यायचं आम्हाला माहिती आहे.

21Views

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबू नायडू करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशात रॅली झाल्यानंतर लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी उपोषणास सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू प्रचारसभांसाठी जनतेच्या पैशांची नासा़डी करत असल्याचा आरोप केला होता.

‘आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गोळा झालो आहोत. आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेलो होती. याची गरजच काय असं मला विचारायचं आहे’, असा प्रश्च चंद्राबाबू नायडू यांनी विचारला आहे.

‘जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहित आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा’, असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजधर्माचं पालन केलं नाही. त्यांच्या सरकारने आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्यास नकार दिला आहे. तुम्ही तुमचा शब्द का पाळत नाही ? जर तुम्ही केलं नाहीत तर ते कसं करुन घ्यायचं आम्हाला चांगलं माहिती आहे’, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशावर अन्याय होत असल्याचा आरोप करत चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपण आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्यापेक्षाही जास्त काही ऑफर केलं होतं असा दावा केला. ‘चंद्राबाबू नायडू राज्याचा विकास करु शकत नाही आहेत तसंच राज्यावरील खर्चाचा हिशोब देऊ शकत नाही आहेत त्यामुळेच विषय भरकटवत आहेत’, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply